Anjangaon News : माढा तालुक्यातील अंजनगावमध्ये खेलोबा मंदिरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक पुतळा बसवण्यात आला होता. ही जागा खेलोबा मंदिराची असल्याचा सांगत पुजाऱ्याने उपोषण सुरू केले होते. तर, ही जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे सांगत पुतळा बसवणाऱ्यांनी सांगितले. या वादाला काही समाजकंटक मराठी विरुद्ध धनगर असे रुप देत होते. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेलया या वादावर शुक्रवारी रात्री यावर तोडगा काढण्यात आला आहे.
ज्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला ती जागा खेलोबा देवस्थानची असल्याचे दोन्ही समाजाचे एकमत झाले आहे. त्यामुळे या पुतळ्याचा स्थलांतर केले जाणार आहे. दोन्ही समाजातील समाज प्रतिनिधी एकत्र जागेचा शोध घेत तेथे या पुतळ्याचे स्थलांतर केले जाणार आहे. प्रशासन आणि स्थानिक राजकीय नेत्यांकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. माजी आमदार राजन पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर यावर तोडगा काढण्यात आला.
शुक्रवारी रात्री मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, पालकमंत्री गोरे, नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन,कोल्हापूर परिक्षेत्राचे आय जी सुनील फुलारे, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णीय यांची बैठक पार पडली. या बैठकीत तोडगा काढण्यात आला. मराठा समाज जी जागा पसंत करेल तिथे पुतळ्याचे स्थलांतर होणार, असे ठरले आहे. शनिवारीच या पुतळ्याचे त्या जागेत स्थलांतर होणार आहे. त्यादृष्टीने त्या जागेचा शोध घेतला जाणार आहे.
पुतळ्याचे स्थलांतर होणार असल्याने तसेच ही जागा मंदिर देवस्थानची असल्याचे बैठकीत मंजुर करण्यात आले होते. दोन्ही समाजाने प्रशासनाला सहकार्य करत तोडगा काढल्याने अखेर शुक्रवारी रात्री खेलोबा मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी आपले आंदोल मागे घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.