Eknath Shinde | Ajit pawar | Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Politics : 'बंडोबां'चा 'थंडोबा' करण्यासाठी महामंडळ; व्हायरल यादीवर गोंधळ

सरकारनामा ब्यूरो

ब्रिजमोहन पाटील

Mumbai News: सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांकडून 27 महामंडळ, समित्यांच्या नियुक्ती केलेली यादी व्हायरल झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महामंडळ व शासनाच्या समित्यांवर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांनी खूष करण्याचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्र्यांनी महामंडळ आणि समितीत्यांवरील नियुक्तीस मान्यता दिली असली तरी संबंधित विभागाकडून अध्यक्ष, उपाध्यक्षांची नियुक्ती करण्याचे आदेश प्राप्त झाले नसल्याने राजकीय गोंधळ उडाला आहे. अनेकजण विधानसभेसाठी इच्छुक असताना त्यांना महामंडळ देऊन बोळवण केल्याचा प्रयत्नही फसला आहे. 'सकाळ'ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

महायुती सत्तेत आल्यापासून महामंडळाच्या आणि सरकारी समित्यांवरील नियुक्ती रखडल्याची चित्र होते. त्यामुळे पदाधिकार,नेते अस्वस्थ होते. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक होते. त्यामुळे बंडखोरी होण्याची देखील शक्यता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात चार महामंडळाचे अध्यक्ष नियुक्त करून केले होते. पण भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणालाही संधी देण्यात आलेली नव्हती.

संबंधितांना अधिकृत माहितीच नाही

आचारसंहिता लागू होण्याच्या आधी अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीचे आदेश संबंधित खात्यांकडून काढणे अपेक्षित होते. पण नियुक्तीचे पत्र अद्याप पदाधिकाऱ्यांना मिळालेले नाहीत, तसेच ज्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील आम्हाला असे काही त्यांना कळवण्यात आले नसल्याचे सांगितले.

राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न

महामंडळ आणि समितिच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन प्रयत्न केल्याचे दिसते आहे. पुणे कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले दिलीप कांबळे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, पर्वती मतदारसंघातून इच्छुक असलेले श्रीनाथ भिमाले यांना कंत्राटी कामगार सल्लागार महामंडळांच्या अध्यक्षपदाची शिफारस केली आहे. दौंड विधानसभेतून इच्छुक असलेले वासुदेव काळे यांची कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या प्रशांत परिचारक यांची राज्य सरकार व कृषी पणन मंडळ अध्यक्षपदासाठी शिफारस केली असल्याचे यात नमूद केले आहे. यासह अन्य इच्छुकांची नावे यादीत आहेत.

ही आहेत व्हायरल यादीतील नावे

महिला आर्थिक विकास महामंडळ- अध्यक्ष मिनाक्षी शिंदे, उपाध्यक्ष राणी द्विवेदी

आदिवासी विकास महामंडळ - अध्यक्ष काशिनाथ मेंगाळ

पै. कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ - उपाध्यक्ष

(राज्यमंत्री दर्जा) विजय चौगुले

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ - उपाध्यक्ष अजय बोरस्ते

महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ - उपाध्यक्ष भाऊसाहेब चौधरी

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - उपाध्यक्ष कल्याण आखाडे

राज्य ग्राहक संरक्षण परिषद - अध्यक्ष संदीप लेले, उपाध्यक्ष अरुण जगताप

राज्य सहकार विकास महामंडळ - अध्यक्ष अरविंद पोरट्टीवार

राज्य सरकार व कृषी पणन मंडळ अध्यक्ष - प्रशांत परिचारक

मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ - उपाध्यक्ष इद्रिस मुलतानी

राज्य बियाणे महामंडळ - अध्यक्ष प्रमोद कोरडे

कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद - अध्यक्ष वासुदेव काळे

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी राज्य मेंढी व शेळी विकास महामंडळ - अध्यक्ष विजय वडकुते, उपाध्यक्ष बाळासाहेब किसवे, संतोष महात्मे

राज्य पेट्रोकेमिकल्स महामंडळ - अध्यक्ष अतुल काळसेकर

राज्य गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार मंडळ - अध्यक्ष गोविंद केंद्रे

इस्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) - सदस्य बळिराम शिरसकर

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास मंडळ - उपाध्यक्ष दौलत शितोळे

वन विकास महामंडळ - उपाध्यक्ष अतुल देशकर

राज्य सरकारी बॅंक वेतन समिती - अध्यक्ष नरेंद्र सावंत

रोजगार हमी परिषद - अध्यक्ष शहाजी पवार

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती - उपाध्यक्ष सचिन साठे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ- अध्यक्ष दिलीप कांबळे

राज्य वखार महामंडळ - अध्यक्ष राजेश पांडे

राज्य कंत्राटी कामगार सल्लागार महामंडळ - अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

राज्य सफाई कर्मचारी आयोग - अध्यक्ष सतीश डोगा, उपाध्यक्ष मुकेश सारवान

वसंतराव नाईक विमुक्त जात व भटक्या जमाती विकास महामंडळ - अध्यक्ष निलय नाईक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT