Summary :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे.
जरांगे पाटलांनी सरकारला थेट इशारा देत "मागण्या मान्य नाही केल्या तर सरकार उलथून टाकू" असं वक्तव्य केलं.
या वक्तव्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया देत त्यांना भाषेची मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला.
Mumbai News : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी पुन्हा एकदा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी एल्गार पुकारला आहे. त्यासाठी मुंबईत 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण याधी त्यांनी सरकारला आपल्या मागण्या मान्य करा अन्यथा सरकारसुद्धा उलथून टाकू शकतो, असा इशाराच जरांगे पाटील दिला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता तापले आहे. याच वक्तव्याचा भाजप नेते आणि सास्कृतीक मंत्री आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांनी फटकारलं आहे. तसेच एक सल्लाही दिला आहे. यामुळे जरांगे पाटील आता याला कसे उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. साम टीव्हीचे संपादक निलेश खरे यांना घेतलेल्या Black & White या विशेष मुलाखतीत शेलार यांनी हल्लाबोल केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा समजा हा आरक्षण मागत असून महायुती सरकारने 10 टक्के आरक्षण दिले आहे. पण मराठ्यांना हे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून हवं आहे. या मागणीसह अन्य मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र काढले आहे. ते मुंबईत 29 ऑगस्टला आंदोलन करणार असून याची माहिती त्यांनीच दिली आहे.
दरम्यान जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना पत्रकार परिषद घेतली. ज्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले. तसेच आमच्या मागण्या पूर्ण करा, त्यासाठी सरकारला 26 ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत देत आहे. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सरकारसुद्धा उलथून टाकू शकतो, असा इशाराच जरांगे पाटील यांनी दिला होता.
या इशाऱ्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं असतानाच भाजप नेते अशिष शेलार यांनी दोनच शब्दात याचा समाचार घेतला आहे. शेलार यांनी, सध्या राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध दलित अशा स्वरूपाचं राजकारण पेटवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी, जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरही स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणार आहेत. ते मुंबईत येणार आहेत. ते येऊ शकतात. त्यांचं स्वागतच आहे. त्यांना विरोध करण्याचा विषयच येत नाही. त्यांनी आपल्या मागण्या मांडाव्यात. त्यालाही कोणाची काहीच अडचण नाही. पण त्या लोकशाहीच्या चौकटीमध्ये असाव्यात. त्यांनी भाषेच्या मर्यादा सांभाळल्या पाहिजे. सरकार उलथवण्याचं ही भाषण करणं योग्य नाही. एकवेळ ती भाषणातील असेल तर ती आपण समजू शकतो. त्याला महत्त्व देण्याची गरज नाही.
पण आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी आपण कोणत्या भाषेची आक्रमकता वापरतो हे पाहायला हवं. भाषेची योग्य सांगड घालायला हवी. आपण काय व कधी करतो याचाही विचार व्हायला हवा. सध्या मुंबईत गणेशोत्सव सुरू आहे. ते येथे गणपतीच्या दर्शनासाठी येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. सध्या घडीला भाविक असो किंवा त्यांच्याबरोबर येणारे मराठा आंदोलक त्यांचीही इच्छा कोणाला त्रास देण्याची नसावी. त्यांच्याही मनात कोणाला अडचण व्हावी अशी नाही. त्यामुळे माझी एकच विनंती आहे चर्चा जरूर व्हावी, पण... असेही शेलार यांनी म्हटलं आहे.
प्रश्न 1: मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख कधी जाहीर केली?
उत्तर: 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणार आहे.
प्रश्न 2: जरांगे पाटलांचा इशारा नेमका कशाबद्दल होता?
उत्तर: सरकारने मराठा आरक्षणाची मागणी मान्य नाही केली तर सरकारसुद्धा उलथून टाकू, असा इशारा त्यांनी दिला.
प्रश्न 3: आशिष शेलार यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: शेलार यांनी जरांगे पाटलांना भाषेची मर्यादा पाळावी आणि संयमित भाषा वापरावी असा सल्ला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.