Maratha Reservation News Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation News : जरांगेंच्या सभेआधीच अशोक चव्हाणांनी सरकारवर केला वेळकाढूपणाचा आरोप...

Congress News : ज्याअर्थी राज्य सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती, त्याअर्थी त्यांचा रोडमॅप निश्चित असावा.

Jagdish Pansare

Ashok Chavan News : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची सभा अवघ्या काही तासांनी होणार आहे. (Maratha Reservation) राज्याच्या कानकोपऱ्यातून मराठा समाज बांधव अंतरवालीकडे निघाले आहेत. लाखोंच्या गर्दीत उद्या जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात? समाजाला काय मार्गदर्शन करतात? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे तत्कालीन अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राज्य सरकारवर मराठा समाजाची दिशाभूल आणि वेळकाढूपणाचा आरोप केला आहे. (Congress) जरांगे यांच्या सभेआधीच अशोक चव्हाण यांनी सरकारविरोधातील असंतोषाला हवा देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केल्याची चर्चा आहे.

माध्यमांना प्रतिक्रिया देतांना चव्हाण यांनी महिनाभराची मुदत मागून घेतल्यानंतर आता उद्या ठोस निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही केली आहे. (Maharashtra) मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांना एक महिन्याचा वेळ मागितला होता. जरांगे पाटील यांनी १० दिवस अधिक दिले होते. राज्य सरकारने मागितलेली एका महिन्याची मुदत उद्या संपते आहे.

ज्याअर्थी राज्य सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती, त्याअर्थी त्यांचा रोडमॅप निश्चित असावा. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे एका महिन्यात काय घडले आणि पुढील कार्यवाही काय असेल, याबाबत स्पष्टता केली पाहिजे. मराठा आरक्षणाबाबत समाजाच्या भावना तीव्र आहेत. आपली दिशाभूल होते आहे, आपल्याला खोटे सांगितले जाते आहे, वेळकाढूपणा सुरू आहे, अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण होऊ लागली आहे.

लोकांच्या भावनांचा राज्य सरकारने आदर केला पाहिजे. आरक्षण कसे द्यायचे, याबाबत वेगळे मतप्रवाह असू शकतात. मात्र, आरक्षण मिळालेच पाहिजे, याबाबत मराठा समाजाचे एकमत आहे. त्यावर राज्य सरकार ठोस भूमिका घेईल, अशी अपेक्षा आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाची ५० टक्के मर्यादेची अट रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी. असे झाले तर मराठ आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल, शिवाय घटना दुरुस्ती केल्यामुळे ते टिकेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT