Ashok Chavan on Rahul Gandhi Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Chavan on Rahul Gandhi: राहुल गांधींचे ते विधान चुकीचं; अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

Mangesh Mahale

महाराष्ट्रातील एक नेता रडत रडत सोनिया गांधींना म्हणाला की, माझ्यात या शक्तिविरोधात लढण्याची हिंमत नाही. मी काँग्रेस पक्ष सोडतो, असा गौप्यस्फोट करीत काँग्रेस नेते राहुल गांधींनी (rahul gandhi) रविवारी नाव न घेता माजी मुख्यमंत्री, सध्याचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर टीका केली. त्याला अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan on Rahul Gandhi) प्रत्युत्तर दिले.

राहुल गांधी यांचे विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही. त्यांचे हे विधान चुकीचे आहे," अशी प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. रविवारी मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी यांनी नाव न घेता एक काँग्रेस नेता भीतीपोटी भाजपमध्ये गेल्याचे विधान केले होते. त्या नेत्याने आपल्या आईसमोर रडून व्यथा मांडल्याचे ते म्हणाले. त्याला अशोक चव्हाण यांनी उत्तर दिले.

"मी सोनिया गांधी यांना भेटलो नाही, त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझी भावना व्यक्त केल्याचे विधान चुकीचं आणि दिशाभूल करण्यासारखं आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करीत होतो. मी पक्ष सोडेपर्यंत ही माहिती कोणालाही नव्हती हे वास्तव आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचं विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते चुकीचं आहे," असे अशोक चव्हाण म्हणाले.

काही नेते भीतीपोटी भाजप प्रवेश करत असल्याचे चव्हाण यांना विचारले असता, इतराबद्दल मी बोलणार नाही, प्रश्न माझ्याबाबत आहे, पण मी निर्णय घेताना भाजपचे भविष्य आणि भवितव्य असल्यामुळे मी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे चव्हाण म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले होते राहुल गांधी

काँग्रेस पक्ष सोडण्यापूर्वी अशोक चव्हाण रडण्याचे कारणही राहुल गांधींनी काल (रविवारी) सांगितले. ते म्हणाले, आम्ही भाजप किंवा (Narendra Modi) नरेंद्र मोदींविरोधात लढत नाही. एका व्यक्तीचा चेहरा समोर केला जात आहे. हिंदू धर्मात एक शब्द आहे तो म्हणजे शक्ती. आम्ही त्या शक्तीविरोधात लढत आहोत. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. ईडी, सीबीआय, आयटी या संस्था आहेत. राज्यातील एक मोठा नेता काँग्रेस पक्ष सोडतात. ते सोनिया गांधींसमोर (Sonia Gandhi) बसून रडतात. रडता-रडता म्हणतात, की मला लाज वाटते. माझ्यात या लोकांविरोधात, या शक्तीविरोधात लढण्याची हिंमत नाही, असे म्हणत राहुल यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT