Ashok Kharat News : नाशिकमधील तथाकथित अंकशास्त्रज्ञ, ज्योतिष अशोक खरात याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. त्याच्या कार्यालयातमध्ये पेनड्राईव्ह मिळून आला त्यामध्ये तब्बल 58 व्हिडिओ आहेत. एका महिलेने खरात याच्या विरोधात लैंगिंक शोषणाची तक्रार केली होती.
पोलिसांनी तक्रारीची खातरजमा केल्यानंतर खरातला अटक करण्यासाठी खास प्लॅन आखला होता. त्याला जर पोलिस कारवाईचा संशय आला असता तर तो फरार झाला असता. त्यामुळे पोलिसांनी या कारवाईची गुप्तता पाळली होती.
पोलिसांनी खरातला त्याच्याच घरातून अटक करण्याच्या प्लॅन आखला. मात्र, अचानक पोलिस घरात आले असते तर तो सावध झाला असता आणि पळून गेला असता त्यामुळे तो राहत असलेल्या परिसरात चोर शिरला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आल्या.
त्या परिसरातील काही घरांची झडती पोलिसांकडून घेण्यात आली. त्याच वेळी खरातच्या घराची झडती घेण्यासाठी पोलिस त्याच्या घरात शिरले. आणि खरात दिसताच त्याला अटक केली. या अचानक झालेल्या कारवाईने तो देखील गोंधळून गेला. आणि त्याला काही हालचाल करता आली नाही.
अशोक खरात प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणाची तपास करण्यासाठी IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.