Rupali Chakankar News Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Chakankar News : बलात्कारप्रकरणी अटक केलेल्या अशोक खरातच्या संस्थेशी थेट संबंध, पाद्यपुजेचा व्हिडीओही समोर; रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया...

Ashok Kharat case news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून चाकणकरांवर निशाणा साधला आहे.

Rajanand More

Rupali Chakankar reaction : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्य अध्यक्षा रुपाली चाकणकर या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. नाशिकमधील अशोक खरात ऊर्फ कॅप्टन या भोंदूबाबाला पोलिसांनी आज अटक केली आहे. गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याच्या खरातवर आरोप आहे. विशेष म्हणजे या आरोपीच्या संस्थेशी चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे समोर आले आहे.

अशोक खरात हा अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटींमध्ये प्रसिध्द होता. अनेकजण त्याच्याकडे आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यामुळे खरात याच्या अटकेमुळे खळबळ उडाली आहे. अशोक खरातचे पाद्यपूजन करतानाचा व्हिडिओ तसेच त्याच्यासाठी छत्री धरतानाचे चाकणकर यांचे फोटो आता समोर आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

खरातची शिवनिका संस्थान ट्रस्ट ही संस्था असून याच संस्थेच्या चाकणकर या विश्वस्तही आहेत. सोशल मीडियात यावरून टीका-टिप्पणी होऊ लागल्यानंतर चाकणकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हटले आहे चाकणकरांनी?

रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काहीवेळा तिथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात, त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेले होतो. ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत.

कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत, त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलिस तपासावर माझा पुर्ण विश्वास आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून चाकणकरांवर निशाणा साधला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT