Mallikarjun Kharge Sarkarnama
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi Manifesto : भाजप काॅपी बहाद्दर; 'मविआ'चा महाराष्ट्रनामा जाहीर करताना मल्लिकार्जुन खरगेंचा टोला

Congress Party National President Mallikarjun Kharge published the manifesto of Mahavikas Aghadi in Mumbai : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केला.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाविकास आघाडीचा निवडणुकीसाठी जाहीरमाना प्रकाशित करताना काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महायुतीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या जाहिरनाम्यात पंचसूत्री असून, त्याला 'महाराष्ट्रनामा', असं नाव देण्यात आलं आहे.

"कर्नाटकमधील महालक्ष्मी योजना काँग्रेसने लागू केली. त्यावेळी भाजपने टिंगल उडवली. आता आमची योजना काॅपी अन् चोरी करून लाडकी बहीण योजना आणली आहे. कर्नाटकमध्ये आम्ही 1 कोटी 22 लाख महालक्ष्मी योजनेचा लाभ महिलांना मिळाला असून, महाराष्ट्रात महालक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना प्रतिमा 3000 रुपये देणार", असे मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केले.

महाविकास आघाडीच्या (MVA) जाहिरनाम्याला 'महाराष्ट्रनामा', असं नाव देण्यात आलं आहे, असे सांगून मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "राज्यात असंविधानिक महायुती सरकार आले. पक्ष फोडले. आमदार खरेदी केले गेले. 50 खोके एकदम ओके, घरात भरून ठेवा आणि सरकार चालवा, असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला. महाविकास आघाडीचा जाहिरनामान्यात पंचसूत्री कार्यक्रम ठेवण्यात आला आहे". कर्नाटकमध्ये महालक्ष्मी योजना लागू करताना नरेंद्र मोदी यांना टीका केली होती. रेवडी दिली जात आहे. टिंगल उडवली. पण आज महाराष्ट्रात तेच दीड हजार रुपये देत आहेत. कर्नाटकमध्ये आम्ही दोन हजार देत आहे. आमची काॅपी केली. यानंतर भाजपने अनेक ठिकाणी लाडकी बहिणी योजना लागू केली. महाराष्ट्रात देखील इथं लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि आम्हाला नावं ठेवली जातात, असा टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या जाहीरनामांमध्ये भविष्यातील महाराष्ट्राला पाहता 5 महत्त्वाच्या पाच मुद्यांवर काम करणार असल्याचे मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी सांगितले. निरोगी महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र, सर्व समावेश महाराष्ट्र आणि सशक्त नागरी महाराष्ट्र या महत्त्वाच्या मुद्द्यांना स्थान देण्यात आले आहे. पहिल्या 100 दिवसात करण्यात येणाऱ्या योजनांचा आणि उपाय योजनांवर मल्लिकार्जुन खरगे यांनी भाष्य केले.

जाहिरनाम्यात प्रमुख घोषणा

महालक्ष्मी अंतर्गत महिलांना प्रतिमा 3000 रुपये देणार, महिलांना बस प्रवास मोफत करणार, स्वयंपाकाचे 6 गॅस सिलिंडर प्रत्येकी 500 रुपये उपलब्ध करणार, तीन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नियमित कृषी कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान दिलं जाणार, नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना चार हजार रुपये स्टायपन महिन्याला दिला जाणार, हेल्थ विमा संरक्षण 25 लाखापर्यंत देणार, जातीय जनगणना, 50 टक्के आरक्षणाची मर्यादा महाराष्ट्रात हटवणार, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा, 300 युनिटमध्ये 100 युनिटपर्यंत मोफत वीज, उद्योग-व्यवसायाला गती देणार, MPSC मार्फत अडीच लाख सरकारी पदे भरणार, सरकार येताच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करणार, इंदूमिलमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारणार, 2030 पर्यंत समृद्ध महाराष्ट्रासाठी वेगवान विकासावर भर देणार, अशा प्रमुख मुद्यांवर जाहिरनाम्यात भर देण्यात आल्याकडे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले.

महाराष्ट्रात सुशासनावर भर असणार

याशिवाय महिलांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणार, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, युवक शिक्षण, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, सामाजिक न्याय, जनतेच्या हितासाठी, शहर विकास, सुशासन, महाराष्ट्राचा स्वाभिमान या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 'मविआ'चा 'महाराष्ट्रनामा' प्रकाशित करताना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, खासदार अभिषेक मनु सिंघवी, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यासह 'मविआ'चे प्रमुख नेते उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT