Prithviraj Chavan Sarkarnama
महाराष्ट्र

Prithviraj Chavan Vs Devendra Fadnavis : मोदींचा 'तो' फोटो शेअर करत चव्हाणांनी फडणवीसांना बरच काही सुनावलं

Congress Prithviraj Chavan strong reply to BJP leader Devendra Fadnavis who criticized the red color of Constitution book in Rahul Gandhi hand : संविधानाच्या लाल रंगावरून राहुल गांधी यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना पृथ्वीराज चव्हाणांनी टायमिंग साधलं.

Pradeep Pendhare

Mumbai News : काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी नागपूर दौऱ्यावर आले अन् भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या हातातील संविधान आणि त्याच्या लाल रंगावरून डिवचले. तसेच शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देण्यासाठी राहुल गांधींचा हा दौरा असल्याची टीका फडणवीसांनी केली होती.

आता हीच टीका फडणवीस यांच्या अंगलट येऊ लागली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावरून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. यासाठी त्यांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर तुमचं काय मत आहे, असा प्रश्न केला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टायमिंग साधत फोटो 'एक्स'वर शेअर केला आहे. 'राज्य घटनेची प्रत निळ्या रंगाची आहे. पण राहुल गांधी (Rahul Gandhi) लाल रंगांची दाखवतात, यावर गांधींना नेमका कोणता इशारा द्यायचा आहे', असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर फोटो पोस्ट करत उत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा फोटो 'एक्स' खात्यावर पोस्ट शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या हातात राज्यघटनेची प्रत आहे. राज्य घटनेचे हे पुस्तक लाल रंगाचे आहे. हा फोटो पोस्ट करून पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांना घेरलं आहे.

"संविधान हे पवित्र आहे. तो आपल्या प्रजासत्ताकाचा पायाभूत कायदा आहे. त्याला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत, हे दुर्दैवी आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकांकडे संविधान असले पाहिजे, या उद्देशाने राहुल गांधी संविधानाची प्रभावीपणे जनजागृती करत आहेत", असे पृथ्वीराज चव्हाण यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

फडणवीस नेमकं काय म्हणाले...

"भारत जोडो हा एक समूह आहे. यात अनेक संघटना असून, कडवट डाव्या विचारांच्या संघटना यात आहेत. या संघटनांची कामाची पद्धत पाहिल्यास अराजकता पसरवण्याचे काम करते. राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा आम्ही सन्मानच करतोच. पण तुम्ही लाल संविधान दाखवून,लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहात? संविधानाचा अर्थ असतो 'ऑर्डर', तर 'एनआरके'चा अर्थ 'डिसऑर्डर' असा आहे. संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली समाजामध्ये अराजकता पसरविणाऱ्यांना एकत्र केले जात आहे. शहरी नक्षलवादाचा अर्थ वेगळा नाही. लोकांची मनात द्वेष निर्माण करायचा, अराजकता निर्माण करायची. देशाच्या संस्था, व्यवस्थेवरील विश्वास उडेल आणि कुठेतरी देशाच्या एकतेला ठेच पोचवण्याचे काम या अराजकतेच्या माध्यमातून सुरू आहे", असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT