Vaccination  Sarkarnama
महाराष्ट्र

लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राज्यात राबवणार म्हणजे नेमके काय करणार?

नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चाही झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोरोनाचे सावट कमी झाले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता औरंगाबाद पॅटर्न राबवणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. या पॅटर्ननुसार आता राज्याच लसीचा एकही डोस न घेतलेल्या लोकांना पेट्रोल, डिझेल, रेशन आणि गॅस मिळणार नसल्याचा निर्णय सरकराने घेतला असल्याची माहिती मिळत आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चाही झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सर्व मंत्र्यांनीच राज्यभरात औरंगाबाद पॅटर्न राबवण्यात यावा असे या बैठकीत म्हटले आहे.

औरंगाबादमध्ये लसीरकणाला असलेला अल्प प्रतिसाद आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅटर्न सध्या औरंगाबादमध्ये राबवला जात आहे. यानुसार ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही त्यांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस अशा जीवनावश्यक वस्तू मिळणार नाही. याशिवाय जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्येही लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता हा औरंगाबाद पॅटर्न राज्यभर राबवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्के आहे. हे प्रमाण राज्यातील टक्केवारीच्या तुलनेत कमी असून लसीकरणामध्ये औरंगाबाद जिल्हा २६ व्या क्रमांकावर आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठीच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबाद पॅटर्न तयार केला आहे. यानुसार अधिकाधिक लोकांनी लस घ्यावी यासाठी अभियान राबवण्यात येणार आहे. यात पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, स्वस्त धान्य दुकान, कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी येणाऱ्या ग्राहकांकडे लसीकरण प्रमाणपत्र असल्याचे बघितल्यानंतरच त्यांना सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात द्यायच्या आहेत. त्यामुळे सुविधा हव्या असतील तर किमान कोरोना लसीचा पहिला डोस घेणे बंधनकारक आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रानेही लसीकरणा चांगलीच गती घेतली असून १० कोटी लसीकणाचा टप्पा ओलांडला आहे. उत्तप्रदेशनंतर १० कोटींचे लक्ष्य गाठणारे महाराष्ट्र दुसरे राज्य आहे. देशातील १०० कोटींच्या पार गेलेला लसीकरणाचा आकडा बघता १० टक्के वाटा राज्याचाच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT