Rupali Chakankar addresses media after police arrest in Badlapur illegal IVF and egg sale racket, urging women to file confidential complaints. Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Chakankar : महिला आयोग खडबडून जागा रूपाली चाकणकरांचे बदलापूर रॅकेटबाबत मोठं विधान; म्हणाल्या...

Badlapur IVF racket : बदलापूर अवैध स्त्रीबीज विक्री प्रकरणाचा तपास राज्यभर वाढवण्यात आला असून रूपाली चाकणकर यांनी महिलांना गोपनीय तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी नाशिकमधून डॉक्टरला अटक केली.

Sudesh Mitkar

Pune News : बदलापूरमध्ये उघडकीस आलेल्या अवैध स्त्रीबीज विक्री प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई केली आहे. या प्रकरणातील तपासात नाशिक येथील मालती आयव्हीएफ सेंटरचे संचालक डॉ. अमोल पाटील यांना बदलापूर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. यानंतर महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याबाबत माहिती देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, बदलापूर अवैद्य स्त्रीबीज विक्री प्रकरणात डॉक्टर अमोल पाटील याला नाशिक मधून ताब्यात घेण्यात आल आहे. त्याला बुधवारी (ता. 4) कोर्टामध्ये हजर करण्यात येईल. मी या प्रकरणी बदलापूर पोलीस स्टेशनला भेट देत सर्व विभागाशी सविस्तर चर्चा केली होती. आणि सूचना दिल्या होत्या की केवळ बदलापूर नाहीतर नाशिक, ठाणे यासह संपूर्ण राज्यात या प्रकरणाचा तपास करावा.

या तपासादरम्यान जळगाव येथून देखील एका आरोपीला ताब्यात घेतले असून तो व्यक्ती खोटे आधार कार्ड वापर करून महिलांवर ट्रीटमेंट करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच मालती आयव्हीएफ सेंटर ज्याला नाशिकमधून परवानगी असताना ते ठाण्यामध्ये अवैधरित्या हे सुरू होतं, आणि त्या ठिकाणी महिलांवर अवैधरित्या ट्रीटमेंट सुरू होती.

याप्रकरणी अनेक महिलांनी तक्रार दाखल केली आहे. मात्र ज्या महिलांनी तक्रार दाखल केली नाही. त्यांनी तक्रार दाखल करावी त्यांची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असं रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.

तसेच संपूर्ण राज्यात असलेले हे रॅकेट मुळापासून उकडून टाकण्याचं काम पोलीस करत आहेत. यावर राज्य महिला आयोगाचे लक्ष आहे. त्यामुळे ज्या महिलांवर अन्याय झाला आहे. त्या महिलांनी पुढे येऊन तक्रारी द्याव्यात असं रूपाली चाकणकर म्हणल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT