Hitendra Thakur Rajiv Patil Devendra fadanvis  sarkarnama
महाराष्ट्र

Hitendra Thakur : कुटुंब फोडल्याचा हितेंद्र ठाकूर यांना राग, भाजपला धडा शिकवण्यासाठी 'मविआ'ला ताकद देणार?

Roshan More

Hitendra Thakur News : भाजपला सातत्याने साथ देऊनही बहुजन विकास आघाडीतील मोठ्या नेत्याला भाजपने फोडले आहे. बविआचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे आतेभाऊ राजीव पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. राजीव पाटील यांना नालासोपाऱ्यातून भाजपचे तिकीट मिळणार असल्याचीही चर्चा आहे. या संदर्भात एका वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

राजीव पाटील यांच्या भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाने हितेंद्र ठाकूर संतप्त झाले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ते महाविकास आघाडीला साथ देण्याची शक्यता आहे.

राजीव पाटील हे वसई-विरार महापालिकेच माजी महापौर आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याने बहुजन विकास आघाडीने देखील आपल्या फलकांवरून राजीव पाटील यांचे छायाचित्रे हटवण्यात सुरवात केली आहे.

राजीव पाटील हे नालसोपाऱ्यातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, या जागेवरून हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिज ठाकूर हे सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. त्यामुळे ती जागा त्यांना मिळणार नसल्याने राजीव पाटील हे भाजप जात असल्याची चर्चा आहे.

सहा जागा लढण्याचा निर्णय

बविआची कोर कमिटीची बैठक नुकतीच झाली होती. त्यावेळी पालघर जिल्ह्यातील सर्व सहा जागा लढण्याचा निर्णय बविआकडून घेण्यात आला होता. वसईमधून वसईमधून हितेंद्र ठाकूर,नालासोपारामधून क्षितिज ठाकूर आणि बोईसर मधून राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, राजीव पाटील हे भाजपमध्ये जात असल्याने बविआ महाविकास आघाडीला पालघर जिल्ह्यातील इतर तीन जागांवर पाठींबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT