माळेगाव (जि. पुणे): बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा अजित पवार यांचे नाव चर्चेत आले ...यावेळी कारण ठरले ते म्हणजे त्यांचे सुपुत्र जय यांनी केलेले भाषण. या भाषणातून अजित पवार यांचे माळेगाव शहराशी असलेले जुने आणि भावनिक नाते पुन्हा एकदा चर्चेत आले.
अजितदादा त्यांच्या थेट आणि स्पष्ट बोलण्याच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत. माळेगावमधील सभांमध्ये त्यांनी केलेले प्रभावी भाषण आजही अनेकांना आठवते.जय पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, माळेगावमधील त्यांच्या कामांचा आणि लोकांशी असलेल्या संबंधांचा विशेष उल्लेख केला. जय याच्या भाषणामुळे राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या जुन्या भाषणांची आणि त्यांच्या शैलीची पुन्हा चर्चा सुरू झाली.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ जय पवार माळेगावात आले होते. त्यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना ते भावुक झाले. सभेदरम्यान जय पवार यांच्या साध्या, मनमोकळ्या आणि भावनिक भाषणाने माळेगावकर भारावून गेले. त्यांच्या “आय लव्ह यू माळेगाव” या एका वाक्यानेच गावकऱ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.
माळेगाव हे ऐतिहासिक गाव असून ग्रामीण भागात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव म्हणून ओळखले जाते. या गावाशी आमचे अतूट नाते असल्याचे सांगताना जय पवार भावूक झाले. “माझे वडील अजितदादांचे या गावावर विशेष प्रेम होते,” असे सांगत त्यांनी गावकऱ्यांशी आपुलकीचा संवाद साधला.
या सभेचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुयोग सातपुते, बाळासाहेब तावरे, दत्तात्रय येळे उपस्थित होते. यावेळी माजी सभापती अविनाश गोफणे ,धनवान वदक, अँड. राहुल तावरे, युसुफ पठाण, प्रणव तावरे, सायली ढाळे, प्रमोद जाधव , प्रवीण जाधव , दिपक तावरे, शिवराज जाधवराव , रणजीत तावरे, जयदीप तावरे, रविराज तावरे, दादा जराड, अशोकराव सस्ते , विलास तावरे , संजय भोसले, वसंतराव तावरे, भगवान गोंडे, अनिल काटकर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.