Beed News : बीडमधील केज तालुक्यात सरपंचाचे अपहरण करुन खुनाची घटना ताजी असताना बीडमध्ये घरात घुसून गोळीबार केल्याचा प्रकार घडला आहे. बीडमध्ये वाळू माफिया, गोळीबार, खून अशा घटनांमुळे बीड चर्चेत आहेत.
सोमवारी (ता.9) मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून करण्यात आला. 'बीडचा बिहार झालाय' असं म्हणणाऱ्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बनावट नोटा प्रकरणी आरोपी असणाऱ्या अक्षय आठवले या कार्यकर्त्याने हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोळीबारात विश्वास दादाराव डोंगरे (रा.इमामापुर रोड, बीड) हे गंभीर जखमी झाले आहेत.
बीडमध्ये बनावट नोटा प्रकरणातील आरोपीने शहरातील पेठ बीड भागातील घरात घुसून गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.जुन्या वादाच्या कारणावरून हा गोळीबार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या गोळीबारात विश्वास डोंगरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना संभाजीनगर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
याआधीही याच कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती असून बनावट नोटांच्या प्रकारणात हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात गंभीर जखमी असणाऱ्या डोंगरे यांचा जबाब घेण्यासाठी पेठ बीड पोलीस संभाजीनगरला रवाना झाले आहेत.
डोंगरे व आठवले यांच्यात जुना वाद आहे. यापूर्वीही त्यांच्यात मारहाण झाली आहे. याप्रकरणी परस्पर तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अक्षय आठवले याने डोंगरे यांच्या इमामपुर रोडवरील घरात घुसून गोळीबार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.