Subhash Desai Sarkarnama
महाराष्ट्र

Subhash desai : उद्धव ठाकरेंपूर्वी सुभाष देसाई बरसले शिंदे सरकारवर

Political News : महाराष्ट्रात येणारे उद्योग धंदे पळविले जातात. त्यावर मिंदे सरकार काहीच बोलत नाही.

Arvind Jadhav

Nashik News : आमचा गुजरात राज्यावर राग नाही. पण, पंतप्रधान देशाचे असताना एका राज्याला एक दुसऱ्याला एक असा न्याय का लावतात? महाराष्ट्रात येणारे उद्योग धंदे पळविले जातात. त्यावर मिंदे सरकार काहीच बोलत नाही. लाचरांकडून काय अपेक्षा करायची, अशी जळजळीत टीका शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सुभाष देसाई यांनी केली.

नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची जाहिर सभा होणार असून, तत्पूर्वी बोलताना देसाई यांनी शिंदे सरकारवर तोंडसुख घेतले. मोठे उद्योग धंदे पळवले जात आहे. बेरोजगारीचा प्रश्न उभा असताना कामगार कायद्याआड कामगारांचे शोषण सुरू आहे. उद्योगपतींचे गुलाम झालेले केंद्र सरकार मात्र मुग गिळून पाहत आहे. सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांना बहाल करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याची टीका देसाई (Subhash )यांनी केली.

दरम्यान, मुंबई व महाराष्ट्राचे खच्चीकरण सुरू आहे. याबाबतचा ठराव आजच्या अधिवेशना दरम्यान करण्यात आला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोना काळातही उद्योगधंदे महाराष्ट्रात येतील याची काळजी घेतली. ऑनलाईन का होईना कार्यक्रम घेत उद्योग धंदे बंद पडणार नाही, याची काळजी घेतली.

उद्योग धंद्यांना पाचारण केले. हजारो लाखो लोकांचे रोजगार वाचले. त्याचे अनुकरण इतर राज्यांना केले. मी आणि आदित्य ठाकरे दावोसला गेलो होतो. अनेक उद्योग धंदे आणले. पण आज महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरात अन इतर राज्यात पाठवला जातो आहे. आमचा गुजरातवर राग नाही पण पंतप्रधान पदावरील व्यक्तीने योग्य तो न्याय द्यायला हवा. पण तसे होत नाही. विशेष म्हणजे मिंदे सरकार काहीच बोलत नाही. खाली मान घालून हुजरेगीरी सुरू असल्याची टीका देसाई यांनी केली.

बाळासाहेबांनी केले नामकरण

उद्भव ठाकरे (Uddhav thackeray) यांची मंगळवारी जाहीर सभा ज्या मैदानावर होत आहे, त्या मैदानाचे नाव पूर्वी गोल्फ रेस कोर्स असे होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे यांना हे नाव खटकले. त्यांनी या मैदानाचे नामकरण हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असे केले, अशी कामे फक्त शिवसेनाच करू शकते, असे देसाई म्हणाले.

SCROLL FOR NEXT