Bharat Bandh: सरकारच्या कामगार, शेतकरी आणि देशविरोधी धोरणांच्या निषेधार्थ १० केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहयोगी संघटनांनी उद्या (ता. 9 जुलै) रोजी संप पुकारला आहे. बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, महामार्ग, बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रात काम करणारे 25 कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत.
राज्य परिवहन, बँकिंग, टपाल सेवा, कोळसा खाणकाम,कारखाने आणि इतर अत्यावश्यक सेवांवर संपाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपाचा देशाच्या सामान्य सेवेवर परिणाम होईल, असे हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंग सिद्धू यांनी सांगितले.
या संपात २५ कोटींहून अधिक कामगार सहभागी होण्याची आहे. शेतकरी आणि ग्रामीण कामगारही या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. एनएमडीसी लिमिटेड, इतर खनिज, पोलाद कंपन्या, राज्य सरकारचे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि शेतमजूर संघटनांनीही संपाला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजीत कौर यांनी दिली.
गेल्या दहा वर्षांपासून सरकार वार्षिक कामगार परिषद घेत नाही.
चार नवीन कामगार संहिता लागू करून सरकार कामगारांच्या हक्कांवर गदा आणत आहे.
सामूहिक सौदेबाजी, संपाचा अधिकार, कामगार कायद्यांचे गुन्हेगारीकरण न करणे अशी धोरणे कामगारांसाठी घातक आहेत.
नोकऱ्यांची कमतरता, महागाई, घटते वेतन असे प्रश्न वाढत आहेत.
खासगीकरण, आऊटसोर्सिंग आणि कंत्राटी पद्धतीला चालना दिली जात आहे.
देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असताना सरकार निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेत आहे.
सरकार ईएलआय (एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव) योजनेसारख्या कार्यक्रमांद्वारे कंपन्यांना फायदा देत आहे.
एनएमडीसी लिमिटेड, इतर खनिज, पोलाद कंपन्या, राज्य सरकारचे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत.
संपात २५ कोटींहून अधिक कामगार सहभागी होण्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि ग्रामीण कामगारही या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
संयुक्त किसान मोर्चा आणि शेतमजूर संघटनांनीही संपाला पाठिंबा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.