MangalPrabhat Lodha Sarkarnama
महाराष्ट्र

MangalPrabhat Lodha News: राज्य सरकारची मोठी घोषणा; लाडकी बहीण योजनेनंतर महिलांच्या आत्मसंरक्षणासाठी मोठा निर्णय

Political News : येत्या काळात ‘हर घर दुर्गा अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत आता राज्यातील आयटीआयमध्ये आत्मसंरक्षणाचा वर्ग घेतला जाणार आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आदींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातील घरोघरी अन्यायाविरुद्ध लढणारी दुर्गा असावी, या उद्देशाने राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. येत्या काळात ‘हर घर दुर्गा अभियान’ सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत आता राज्यातील आयटीआयमध्ये आत्मसंरक्षणाचा वर्ग घेतला जाणार आहे.

प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहे. वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो, यासारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी दोन तासिका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांनी दिली.

राज्यातील प्रत्येक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ‘हर घर दुर्गा अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना वर्षभर आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या खास तासिकेप्रमाणेच मुलींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणासाठी राखीव तासिका असावी, यासाठी राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेतला होता.

शारीरिक शिक्षणाप्रमाणेच वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो यांसारख्या स्वसंरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी 2 तासिका घेण्यात येणार आहेत. त्याद्वारे आपत्कालीन आणि आव्हानात्मक परिस्थितीत सक्षमपणे लढण्याची ताकद महिलांना देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

दरम्यान, बदलापूर घटनेने आत्मसंरक्षणाचे महत्व अधोरेखित केले आहे आणि त्यामुळे राज्य सरकारने यावर तातडीने उपाययोजना केल्या आहेत. या अभियानामुळे महिलांना आणि मुलींना त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार आहे.

याशिवाय, आयटीआय संस्थांमधील प्रशिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. या अभियानामुळे राज्यभर सुरक्षा आणि आत्मसंतोष वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT