Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

मोठी बातमी ! बैठका, दिल्ली वारी, दावे-प्रतिदाव्यांनंतर महायुतीचं जागावाटप फायनल? असा असणार फॉर्म्युला

Loksabha Election 2024 News : राज्यातील महायुतीच्या 42 जागांवर घटक पक्षांचं एकमत झाले असून, केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी आहे. लवकरच सहा जागांवरचा तिढा सोडविण्यात येणार आहे.

Sachin Waghmare

Political News : लोकसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोग शनिवारी दुपारी करणार आहे. त्यापूर्वीच राज्यातील महायुतीच्या 42 जागांवर घटक पक्षांचं एकमत झाले असून, केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी आहे. लवकरच उर्वरित सहा जागांवरचा तिढा सोडविण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील एक ते दोन जागा मनसेला, तर अमरावतीची एक जागा युवा स्वाभिमान पार्टीच्या खासदार नवनीत राणा यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याचे समजते.

राज्यातील लोकसभेसाठी महायुतीच्या जागा जवळपास ठरल्या आहेत. महायुतीतील घटक पक्षांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट 6, भाजप 25 आणि शिवसेना शिंदे गट 11 जागांवर निवडणूक लढणार आहेत. या तीनही पक्षांनी कोणत्या लोकसभेच्या जागा लढवायच्या यावरही एकमत झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. आता केवळ सहा जागांवर बोलणी सुरू आहे. (Loksabha Election 2024 News)

महायुतीच्या 42 जागांवर घटक पक्षांचे एकमत झाले असून, केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी असल्याचे समोर येत आहे. त्यामध्ये भाजप 25 जागा लढवणार असून, एकनाथ शिंदे 11 जागांवर तर अजित पवार ६ जागांवर निवडणूक लढवणार हे नक्की झाले आहे. त्याशिवाय उर्वरित सहा जागांवर चर्चा सुरू आहे. त्यापैकी काही जागा या मनसेला देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

महायुतीमध्ये मनसेचा सहभाग असणार

महायुतीच्या 42 जागांवर घटक पक्षांचं एकमत झाले असून, केवळ सहा जागांचा तिढा सुटायचा बाकी आहे. त्यामुळे उर्वरित सहा जागांवर चर्चा सुरू आहे. त्यापैकी काही जागा या मनसेला देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दक्षिण मुंबई या जागेचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीला मनसेचे बळ मिळाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत अधिक फायदा होण्याचा अंदाज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजप राज्यात एकूण 25 जागांवर लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यापैकी आतापर्यंत 20 जागांवरचे उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत. केवळ पाच जागांवर उमेदवार जाहीर करायचं बाकी आहे. उर्वरित जागांवर भाजप आपल्या समर्थकांना उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये अमरावतीची जागा नवनीत राणा यांना सोडण्यात येणार आहे.

त्याशिवाय उर्वरित सहा जागा बाकी आहेत. त्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा आहे. ही जागा मनसेला सोडण्यात येणार आहे. त्यासोबतच गडचिरोलीच्या जागेचा पेच कायम आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा अत्राम हे इच्छुक असून, त्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सहा जागा मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने 9 जागांची मागणी केली होती. त्यामध्ये बारामती, शिरूर, रायगड, परभणी, सातारा, धाराशिव या सहा जागा मिळणार असल्याचे समजते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नाशिक, गडचिरोली, बुलडाणा या तीन अशा एकूण नऊ जागेची मागणी केली होती.

R

SCROLL FOR NEXT