Maratha Reservation Court sarkarnama
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबाबतची मोठी अपडेट! सुप्रीम कोर्टात 'या' तारखेला होणार सुनावणी

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाबाबतच्या याच याचिकेबाबत आता सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर येत आहे. आता या याचिकेच्या अंतिम सुनावणीची वेळ जवळ आली आहे.

Sachin Waghmare

Supreme Court News : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुनर्विचार (क्युरेटर) याचिका दाखल करण्यात आली होती. मराठा आरक्षणाबाबतच्या याच याचिकेबाबत आता सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता या याचिकेच्या अंतिम सुनावणीची वेळ जवळ आली आहे. येत्या आठवड्यात सुप्रीम कोर्ट संबंधित याचिकेवर सुनावणी होणार असल्यामुळे लवकरच मराठा समाजाला न्याय मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले होते. या आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आता 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या याचिकेकडे लागले आहे. (Supreme Court News)

सुप्रीम कोर्टात तीन न्यायाधीशासमोर याप्रकरणी इन कॅमेरा सुनावणी होणार आहे. 2014 ते 2019 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधिशानी ट्रिपल टेस्ट न केल्याच्या कारणावरून फेटाळले होते.

ही याचिका फेटाळल्यानंतर सात ते आठ महिन्यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात पुनर्विचार (क्युरेटर) याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी हॊणार आहे, अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली.

अशा प्रकारच्या याचिकांवर बंद दाराआड इन कॅमेरा सुनावणी चालते. त्याशिवाय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा दहा टक्के आरक्षण दिले होते. त्या विरोधातही काही जण कोर्टात गेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर येत्या 11 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात विचार केला जाणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर विचार होणार आहे.

महाराष्ट्र सरकारच्या क्युरेटिव्ह याचिकेवर 24 जानेवारी 2024 रोजी विचार केला जाणार होता. त्यानंतर याचिकेवर विचार करण्यासाठी नवी तारीख निश्चित करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण आरक्षण असंविधानिक असल्याचं म्हणत आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक वाढवण्याची याचिका फेटाळली होती.

मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर राज्य सरकार व माझ्या वतीने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. पण न्याय अद्याप मिळालेला नाही. 11 सप्टेंबरला न्याय आम्हाला मिळेल. सरकारने प्रचत्न केला तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा मला आणि समाजाला आहे, असे याचिकाकर्ते विनोद पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

या प्रकरणी सुप्रीम कोर्टात 11 सप्टेंबरला 1001 क्रमांकाची सुनावणी आहे. दुपारच्या वेळेस मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत निर्णय येणे अपेक्षित आहे, असे विनोद पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT