mla pradnya Satav Sarkarnama
महाराष्ट्र

Pradnya Satav news : मोठी बातमी : काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये प्रवेश करणार? अधिवेशनादरम्यान काय घडलं?

MLA Pradnya Satav news : पक्षातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Rajanand More

Congress setback Maharashtra : राज्यात 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेस सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपने पक्षाच्या महिला आमदारांना गळाला लावले आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार पज्ञा सातव पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे समजते. त्या उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रज्ञा सातव या सध्या विधानपरिषदेच्या आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. प्रामुख्याने हिंगोलीसह मराठवाड्याच्या काही भागात सातव कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग आहे. इथेच भाजपने काँग्रेसला झटका देत ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रज्ञा सातव आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

राजीव सातव हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. राहुल गांधी यांच्या यूथ ब्रिगेडमधील ते महत्वाचे नेते होते. मात्र, सातव यांच्या निधनानंतर पक्षावर मोठा आघात झाला होता. त्यानंतर २०२१ मध्ये पत्नी प्रज्ञा सातव या विधानपरिषदेत बिनविरोध निवडून गेल्या. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा त्यांना संधी देण्यात आली. आता त्यांनी पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

पक्षातील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. पक्षाकडून याबाबत कोणतीही दखल घेतली नाही, असाही त्यांच्या समर्थकांकडून दावा केला जात आहे. त्यामुळेच त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मात्र हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे. पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. अधिवेशन काळात आमची त्यांच्याशी चर्चा झाली होती. अडचणीच्या काळात आम्ही त्यांच्या सोबत असल्याचेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT