Chandrasekhar Bawankule Vs Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrasekhar Bawankule Vs Uddhav Thackeray : वाघनखांच्या साक्षीनं हिरवा कोथळा बाहेर काढू; चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर तिखट टीका

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तसे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला महायुतीकडून सर्वाधिक टार्गेट केले जाऊ लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील दिल्ली दौऱ्यानंतर भाजपवर तुटून पडले आहेत. त्यामुळे शाब्दिक वाॅरमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिखट प्रत्युत्तर दिले आहे. "उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहेत. वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही", अशी तिखट टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यम 'एक्स'वर पोस्ट केली आहे. 'औरंगजेब फॅन क्लब'चे म्होरके जनाब उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन राममुक्त भाजप करायची बोंब ठोकली. पण हे तुम्हाला या जन्मात तरी शक्य होणार नाही. कारण तुम्ही मतांसाठी उबाठा गट हिरवा करून घेतला. छत्रपती शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंगजेबाच्या वारसदारांच्या पालख्या वाहत आहात, अशी तिखट टीका केली.

'हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तुमच्या सारख्या औरंगजेबी वृत्तीला कशी धूळ चारायची हे इथल्या मावळ्यांना ठावूक आहे. आता तर शिवरायांची वाघनखंही महाराष्ट्रात आलीत, त्यामुळे याचं वाघनखांच्या साक्षीनं येणाऱ्या निवडणुकीत मतांच्या शस्त्रानं जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा देखील बावनकुळेंनी (Uddhav Thackeray) दिला. लांड्या, लबाड्या आणि धूळफेक करून तुम्ही जास्त दिवस लोकांना फसवू शकणार नाहीत. तुमच्या रॅलीतील हिरवे झेंडे जनता विसरली नाही. वक्फ बोर्डाचा कायदा लोकसभेत आल्यानंतर तिथे शिवसेना ठाकरे पक्षाने भूमिका घेतली नाही, म्हणून मातोश्रीबाहेर हेच लोकं आंदोलन करत आहेत. मुस्लिम समाजानं हे आंदोलन म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अधोगतीची सुरवात आहे.

हिरवं पांघरलं की, असंच होणार

लोकसभेला आम्ही तुमचे नऊ खासदार निवडून दिले, मग वक्फ बोर्डाची बाजू का घेत नाही? असं म्हणत मातोश्रीबाहेर मुस्लिम समाजानं आंदोलनही केलं. भगवं सोडून हिरवं पांघरलं की, असंच होणार आहे. ही सुरवात आहे तुमच्या अधोगतीची. वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना विसरलात, जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा टोला देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT