Charan Waghmare, Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Charan Waghmare : भाजपच्या माजी आमदाराच्या हाती तुतारी; शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Rajanand More

Mumbai News : राज्यात सध्या सर्वाधिक पक्षप्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत आहेत. रविवारीही भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी तुतारी हाती घेतली. मुंबईत काही समर्थकांसोबत त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी प्रवेश केला.

वाघमारे हे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत त्यांना भाजपने निलंबित केले होते. त्यानंतर ते भारत राष्ट्र समितीमध्ये गेले होते. पण तेलंगणात या पक्षाचा पराभव झाल्यानंतर वाघमारे यांनी लोकसभेला काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाघमारे काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता होती. अखेर त्यांनी तुतारी हाती घेतली. तुमसर मतदारसंघातून ते तुतारीच्या चिन्हावर विधानसभा लढवू शकतात, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. या मतदारसंघात राजू कारेमोरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीमध्ये लढत होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, वाघमारे यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, वाघमारे महाराष्ट्राच्या विधिमंडळात होते, या भागाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं. सामाजिक प्रश्नांची मांडणी केली. त्यांना हा निर्णय घेण्याची स्थिती ज्या पक्षासाठी त्यांनी कष्ट केले त्या पक्षाच्या नेतृत्वाने आणली हे दुःखद आहे. राष्ट्रवादीचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत विचार विनिमय करून त्यांनी पक्षात येण्याचा निर्णय घेतला.

वाघमारे म्हणाले, जनतेकडून मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने आणि पाठिंब्याने माझ्या या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्या काही वर्षांत तालुक्यातील परिस्थितीत अनेक बदल झाले आहेत, आणि यामुळे जनतेचे सहकार्य आणि पाठिंबा आणखीनच वाढला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT