मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दहा तारखेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ''मराठी माणसाच्या भरवशावर आपले राजकारण करायचे आणि संकटात असताना त्याला व त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडायचे, हाच यांचा मराठी बाणा आहे,'' अशा शब्दात पडळकरांनी (Gopichand Padalkar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray government) यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकरांनी समाजमाध्यमांवर व्हिडिओच्या माध्यमाातून एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे.
गोपीचंद पडळकर म्हणतात, ''मागील काही दिवसात माझ्या ३१ मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात आणि त्यातही ३ जणांचे प्राण देवाच्या कृपेने वाचले, तरी या ठाकरे सरकारचा अबोला अजून सुटत नाही. त्यांच्या दारात जाऊन त्यांचे अश्रु पुसणं तर सोडा, साधे दोन ओळीचे सांत्वनाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही. मराठी माणसाच्या भरवशावर आपले राजकारण करायचे आणि संकटात असताना त्याला व त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडायचे, हाच यांचा मराठी बाणा आहे.''
''या ठाकरे सरकारच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावरतीच आणायचे असेल तर मी समस्त एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की ,चला आपला संसार आपल्या पोरा-बाळांसहीत येत्या १० नोव्हेंबरपासून मंत्रालयाच्या आवारातच उघड्यावर थाटू," असे पडळकर म्हणाले.
''आपण आपलं १० तारखेचं आंदोलन लोकशाही मार्गानं लढू आणि जिंकूही पण या आंदोलनाला कोणतही गालबोट लागता कामा नये, याची काळजी आपण सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी घ्यायची आहे. आता एकच निर्धार मंत्रालयाच्या दारातच थाटू संसार .. आता आत्महत्येचं पाऊल कुणीही उचलू नका, कारण आता लढायचंय आणि लढण्यासाठीचं जगायचंय,'' असे पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांना सांगितलं.
अनिल देशमुखांना आणखी धक्का ; मुलगा ऋषिकेश यांना ईडीचं समन्स
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांची गुरुवारी पुन्हा चार तास चौकशी केली. ज्या शेल्ड कंपन्यांमार्फत पैशांचा गैरव्यवहार झाला आहे, त्याबाबत देशमुखांकडे विचारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरा त्याचे पुत्र ऋषिकेश देशमुख (rushikesh deshmukh)यांना ईडीनं समन्स बजावलं. आज सकाळी ऋषिकेश यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिले आहेत. ऋषिकेश देशमुख यांना यापूर्वी दोन वेळा ईडीनं समन्स बजावलं होतं. पण तेही अनिल देशमुख यांच्याप्रमाणे वकिलांमार्फेत ईडीला उत्तर पाठवून ईडीच्या चैाकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत. आज ईडीच्या चैाकशीला ते हजर राहतील का, त्यांना चैाकशीनंतर अटक होईल का, हे लवकरच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.