Nilesh Rane, Ajit Pawar
Nilesh Rane, Ajit Pawar sarkarnama
महाराष्ट्र

अजितदादा, हवेत गोळ्या मारू नका ; खोटारडेपणा थांबवा!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) रिक्त जागा भरण्याबाबत मंत्रीमंडळात बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या होत्या. आपल्या विभागातील रिक्त जागांची माहिती देण्याबाबतच्या सूचना सर्व विभागांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिल्या होत्या. पण अद्यापही अनेक जागा रिक्तच आहे, यावरुन भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी टि्वट करीत अजित पवारांवर टीका केली आहे. आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणतात, ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागांना पद भरती मागणीपत्रे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सर्व विभागांना मागणीनुसार नोकरभरती करण्याच्या सूचनाही दिल्या. अजित पवारांच्या सूचनांना कोणीही भीक घालत नाही, कारण मागच्याच नियुक्त्या अजून झाल्या नाहीत, MPSC असो व इतर विभागातल्या. नियुक्त्या कुठे होत आहेत.''

''MPSC 2019 च्या सर्व गट 'अ' ते गट 'क' ८१७ उमेदवारांच्या नियुक्त्या गेल्या २ वर्षापासून प्रलंबित आहेत. अजित पवार साहेब हवेत गोळ्या मारू नका तुम्ही एका महत्त्वाच्या पदावर आहात, खोटारडेपणा थांबवा. नवीन भरतीच्या सूचना दिल्यात पण मागच्या असंख्य नियुक्त्या शिल्लक आहेत त्याचं काय?'' असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

MPSCची मोठी घोषणा : PSI पदाची परीक्षा पुन्हा लांबणीवर

पुणे : मुंबईसह संपुर्ण राज्यात अवकाळी पाऊस पडतो आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या अवकाळी पावसाचा फटका आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांनाही बसला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलेल्या वेळेतील पोलीस उपनिरीक्षकसाठीच्या (PSI) शारीरिक चाचणी आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत परिपत्रक काढले आहे. आपल्या टि्वटर हॅडलवरुन याबाबतची माहिती दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या या पत्रकामध्ये पोलिस उपनिरीक्षकसाठीच्या पुणे केंद्रावरील दोन दिवसांच्या आणि कोल्हापूर केंद्रावरील एक दिवसाच्या शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे सांगितलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT