Pankaja Munde Sarkarnama
महाराष्ट्र

Pankaja Munde : वाढदिनी पंकजा मुंडेंनी घेतला मोठा निर्णय, '...मी व्यथित'

Roshan More

Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर नुकत्याच आमदार झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस 26 जुलै यंदा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून साजरा केला जाणार असल्याची तयारी सुरू होती. मात्र, पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या आत्महत्येने व्यथित झाल्यानं वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

हारतुरे नको फक्त शुभेच्छांचा एक एसएमएस करा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना व्हिडिओद्वारे केले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, वाढदिवसाच्या दिवशी ताई तुम्ही कुठे भेटणार ? अशा प्रकारचे संदेश मिळत आहेत. तथापि, हारतुरे , सत्कार, बडेजाव असा कोणताही उत्सवी स्वरूपात वाढदिवस साजरा करणे हे सद्य परिस्थितीत समर्पक वाटत नाही. त्यामुळे केवळ आपल्या प्रेमरुपी एका एसएमएसवर वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद प्रदान मला द्यावेत

विधानपरिषदेवर आमदार म्हणून जिंकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी येत्या सोमवारी (ता.29) भगवानभक्ती गडापासून परळीपर्यंत महापुरुषांना वंदन करत दौरा करणार असल्याचे सांगितले आहे.

समर्थकांच्या आत्महत्येने व्यथित

पंकजा मुंडे या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार होत्या. अटीतटीच्या लढतीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारवा लागला. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. पंकजा मुंडे यांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन देखील आपल्या समर्थकांना केले होते. समर्थकांच्या आत्महत्येने पंकजा मुंडे व्यथित झाल्या होत्या. त्यामुळे त्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT