Uddhav Thackeray_Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Nishikant Dubey: मराठी-हिंदी मुद्दांवरुन भाजप खासदारानं राज ठाकरेंना डिवचलं; 'आपल्या घरात कुत्राही वाघ असतो'

Nishikant Dubey on Marathi Row: निशिकांत दुबे हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींनी अडचणीत आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठींना त्यांना समज देणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Mangesh Mahale

मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रात मराठी-हिंदी वरुन राजकारण पेटलं आहे. हिंदी भाषिक राज्यातील नेते मनसेवर तुटुन पडले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी समाज माध्यमावर मनसेला डिवचणारी पोस्ट शेअर केली आहे. मनसैनिकांना थेट आव्हान दिले आहे.

विशेष म्हणजे दुबे यांनी ही पोस्ट मराठीतून लिहिली आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांनी पोस्ट टॅग केली आहे. मराठीवरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्यांना त्यांनी अप्रत्यक्षपणे कुत्र्याची उपमा दिली. आता मनसे त्यांना काय उत्तर हे लवकरच समजेल. मराठी-हिंदी मुद्दांवरुन त्यांनी वाघ-कुत्रा अशा उपमा वापरल्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा." असे निशिकांत दुबे यांनी म्हटलं आहे.

निशिकांत दुबे हे आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. त्यामुळे त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींनी अडचणीत आहे. आता त्यांच्या या वक्तव्यावर पक्षश्रेष्ठींना त्यांना समज देणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

यापूर्वी हिंदी-मराठी वादाची तुलना निशिकांत दुबे यांनी काश्मिरी पंडितांच्या समस्येशी केली होती. उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज यांची मनसे, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आणि सलाउद्दीन, मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केला. दुसऱ्याने हिंदी असल्यामुळे अत्याचार केला, असे विधान निशिकांत दुबे यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT