Devendra Fadnavis Eknath Shinde  sarkarnama
महाराष्ट्र

BJP Politics : शिंदेंची भाजपकडून आणखी कोंडी, चार मंत्र्यांच्या समावेशाला आक्षेप

BJP Eknath Shinde ShivSena mahayuti Maharashtra : महायुतीमधील शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भाजपने सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर चांगलीच कोंडी केली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुख्यमंत्रीपदाचा भाजपचा मार्ग मोकळा करून देणारे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा इथल्या दरेगावी निघून गेलेत. एकनाथ शिंदे यांची ही नाराजी म्हणजे, भाजपच्या कोंडीचा डाव असतानाच, भाजपने देखील एकनाथ शिंदेंची कोंडी वाढवली आहे.

एकनाथ शिंदेंच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपने आक्षेप घेतल्याचे समजते. यावर शिंदे काय निर्णय घेतात, यावर या चार जणांचे मंत्रीपदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षातील संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर आण अब्दुल सत्तार या चार मंत्र्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप आहे. या चौघांच्या कारभारावर भाजपची नाराजी आहे. त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात या चौघांचा समावेश करण्यास भाजपचा तीव्र विरोध आहे. यातून भाजपने एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचे वाढवले आहे.

संजय राठोड यांना बंजारा समाजाला पाठिंबा पाहता, एकनाथ शिंदे राठोड यांना बाहेर ठेवण्यास तयार नाहीत. परंतु भाजप (BJP) काही निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर लादण्यास प्रवेश आणत आहे. यातून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात धुसफूस वाढण्याची शक्यता आहे. सत्तार, सावंत, राठोड यांना हात लावणे शिंदे यांच्यासाठी तापदायक ठरू शकते. ही दुखणारी नस ओळखून भाजपने ती अधिक दाबून एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा डाव आखला आहे. एकनाथ शिंदे देखील हट्टाला पेटले असून, काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी अजून तरी त्यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना नाराज केलेले नाही. भाजपने खासदारकीसाठी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी नाकरली, पण त्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले. पण आता महायुतीच्या सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांची राजकीय कोंडी करण्याचा खेळ रंगला आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून भाजपवर भारीच पडले आहेत. त्यामुळे भाजपने आता कोणतीही तडजोड स्वीकारण्यास तयार नाही. उलट एकनाथ शिंदे यांची अधिकच कोंडी करायचे ठरवल्याचे दिसते. सत्तार, केसरकर, राठोड आणि सावंत यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातील वादग्रस्त मुद्दे, आरोप पुढे करत भाजपने त्यांना पुन्हा नवीन मंत्रिमंडळात समावेशास अप्रत्यक्षापणे विरोध करत एकनाथ शिंदेंवर प्रेशर वाढवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT