महाराष्ट्र

MIM alliance : भाजप की उद्धव ठाकरे? MIM सोबत कोण युती करणार? दोनच नगरसेवक ठरलेत किंगमेकर!

BJP vs Uddhav Thackeray alliance news : भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात MIM कोणाची साथ देणार? दोन नगरसेवक ठरले किंगमेकर, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.

सरकारनामा ब्युरो

वाशिम नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या लढतीत भाजपला स्पष्ट कौल मिळाला. मात्र 32 पैकी अवघे 14 नगरसेवक निवडून आले आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 13 आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. म्हणजेच मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. यामुळे एमआयएमचे निवडून आलेले 2 नगरसेवक किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.

नगरपालिकेत बहुमताचा 17 ही मॅजिक फिगर आहे. सध्याच्या घडीला भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. महायुतीतील घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. त्यातच काँग्रेस किंवा 'एमआयएम' सोबत कोणत्याही प्रकारची तडजोड न करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यामुळे भाजपची राजकीय गणिते बिघडली आहेत.

महाविकास आघाडीचे पारडे :

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 13 आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या दृष्टीने भाजपच्या तुलनेत 'मविआ'चे पारडे जड दिसत आहे. त्यांना एमआयएमच्या 2 नगरसेवकांची साथ मिळाल्यास बहुमताचा 17 हा आकडा गाठता येऊ शकतो.

अंबरनाथ पॅटर्न रिपीट होणार?

भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत आघाडी केली होती. पण ही आघाडी देखील तोडण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले होते. तर काँग्रेसकडून भाजपसोबत आघाडी केलेल्या सर्व 12 नगरसेवकांना निलंबित केले होते. या सर्वांना लगेचच भाजपने पक्षप्रवेश दिला. त्याचप्रमाणे आता वाशिममध्येही काँग्रेसचे दोन नगरसेवक आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो.

कोणते पर्याय

काँग्रेस + शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे + एमआयएम पक्षाची युती

भाजप + शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती

भाजप + काँग्रेसचा दोन्ही नगरसेवक फोडून बहुमत मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT