Eknath Khadse And Vinod Tawde Meeting Sarkarnama
महाराष्ट्र

BJP News: भाजपच्या गोटात मोठी राजकीय घडामोड! 'दिल्लीश्वरां'ची नवी खेळी, तावडेंनी घेतली खडसेंची भेट; महाजनांच्या वाढत्या 'प्रस्था'ला धक्का?

Eknath Khadse And Vinod Tawde Meeting: एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशाच्या अनेकदा चर्चा होत असतात. तर दुसरीकडे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तसं जर पाहिलं तर फारसे सक्रिय नसल्याचं दिसून येतं. पण त्यांची कन्या रोहिणी खडसे या सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत, तर त्यांची सून रक्षा खडसे यांच्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.

Deepak Kulkarni

Maharashtra BJP latest updates today: महाराष्टाच्या राजकारणात दिवसेंदिवस मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. तसेच लवकरच राजकीय उलथापालथीचे संकेतही राजकीय नेतेमंडळींकडून दिले जात आहे. राज्यातील आणि महायुतीतील सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या गोटातूनच राजकारणाला कलाटणी देणारी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोरदारपणे सुरू होती. त्यात त्यांच्या भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटीचे फोटोही व्हायरल झाले होते. परंतू, महाराष्ट्रातील भाजपच्या काही प्रमुख नेत्यांमुळे त्यांची भाजपमधील घरवापसी रखडली होती.मात्र,आता पुन्हा एकदा खडसेंच्या भाजपमधील 'कमबॅक' चे संकेत मिळत आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्यानं भाजपसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विनोद तावडेंनी एकनाथ खडसेंची भेट ही भाजपच्या 'दिल्लीश्वरां'ची नवी खेळी तर नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातवर मजबूत पकड व ओबीसी राजकारणातला प्रमुख चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी खडसेंना पुन्हा एकदा भाजपमध्ये आणण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्याचं दिसून येत आहे.

दिल्लीतील भाजप नेत्यांची एकनाथ खडसेंच्या कमबॅक पाठीमागे मंत्री गिरीश महाजनांचा राज्याच्या तसेच उत्तर महाराष्ट्रातील राजकारणातील वर्चस्वाला धक्का पोहोचवण्याची चाल तर नाही ना अशी शक्यताही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

एकीकडे या चर्चा सुरू असताना आमदार एकनाथ खडसेंनी मात्र,विनोद तावडेंसोबत झालेली आपली ही भेट राजकीय नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, खडसेंचं भाजपमध्ये घरवापसी झाली तर ही महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची घडामोड ठरणार आहे.

एकनाथ खडसे यांच्या भाजपप्रवेशाच्या अनेकदा चर्चा होत असतात. तर दुसरीकडे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत तसं जर पाहिलं तर फारसे सक्रिय नसल्याचं दिसून येतं. पण त्यांची कन्या रोहिणी खडसे या सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत, तर त्यांची सून रक्षा खडसे यांच्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT