Devendra Fadnavis-Manoj jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Politics : मराठे नाराज, विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन बी तयार?

BJP Politics Assembly Elections : मराठवाड्यात विधानसभेला ओबीसी समुहांचे एकत्रिकरण आणि मराठवाड्यातील सर्वाधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला देत तेथे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून केला जाऊ शकतो.

Roshan More

BJP Politics : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. हरियाणात ज्या प्रकारे जाट एकत्र येऊनही भाजपने विजय मिळवला. तोच पॅटर्न भाजप महाराष्ट्रात राबवणार आहे.

हरियाणामध्ये मुख्यमंत्री नायब सैनी यांनी ओबीसीमधील छोट्या जातींचे मेळावे घेत ओबीसी विरुद्ध जाट असे समीकरण बनवले. त्याचा फायदा हरियाणामध्ये पुन्हा भाजपची सत्ता येण्यात झाला. तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याची शक्यता आहे.

मराठा समाज भाजपपासून दूरावत असल्याने पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप मायक्रो प्लॅनिंग करत आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव यांनी ओबीसीमधील छोट्या जातींचे मेळावे घेत आहेत. भाजपने 168 ओबीसी जातींचे मेळावे घेतले आहेत. तसेच सात महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. अकृषिक करापासून दिलासा दिला आहे . त्यामुळे ओबीसींची एकजूट घडवत पुन्हा सत्तेत येण्याचे प्लॅन भाजपचा आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फटका सर्वाधिक मराठवाड्यात भाजपला बसला. मात्र, विधानसभेला ओबीसी समुहांचे एकत्रिकरण आणि मराठवाड्यातील सर्वाधिक जागा एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला देत तेथे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून केला जाऊ शकतो.

15 जाती ओबीसीमध्ये

महाराष्ट्रातील 15 जाती ओबीसीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आली आहे. या 15 जातींच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे. त्यामुळे या जाती ओबीसीमध्ये जात असल्याने त्याचा थेट फायदा भाजपला आणि महायुतीला होणार आहे. बडगुजर,सूर्यवंशी गुजर,लेवे गुजर,रेवे गुजर,रेवा गुजर,पोवार भोयार पवार कपेवार,मुन्नार कपेवार,मुन्नार कापू,तेलंगा,तेलंगी,पेंताररेड्डी,रुकेकरी,लोध लोधा लोधी,डांगरी या जातींचा समावेश ओबीसीमध्ये करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मनोज जरांगेंची टीका

हरियाणात भाजपने विजय मिळवला. मात्र, जाटांची एकजूट असताना हा विजय मिळवला असल्याने महाराष्ट्रात देखील भाजप असाच विजय मिळवेल असा दावा केला जातो आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी एकाचे कुंक लावायचे आणि दुसऱ्याचे नाव घ्यायचे ही त्यांची सवय आहे. त्यांना शेतकऱ्याने, जाटाने, मराठ्याने मतदान केलेच असेल ना.पण होऊन गेलं की दुसऱ्याचं नाव घ्यायचे. मराठ्यांनी पण यांचे 106 निवडून दिले होते. मात्र, दुसऱ्याचं नाव घ्यायचे याची त्यांना सवयच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT