<div class="paragraphs"><p>Sadabhau Khot,&nbsp;Sanjay Raut</p></div>

Sadabhau Khot, Sanjay Raut

 

sarkarnama

महाराष्ट्र

गजरिया यांच्या टि्वटवरुन खोतांची राऊतांवर खोचक टीका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भारतीय जनता पक्ष सोशल मीडिया सेलचे प्रभारी जितेन गररिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे (Ramshi Thackeray) यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्‌विट केले आहे. या टि्वटनंतर महाविकास आघाडी सरकार व भाजप नेत्यांनी एकमेंकावर अनेक आरोप केल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे. गजरिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आठ तासांच्या चैाकशीनंतर त्यांनी माफी मागितली आहे. यावरुन भाजपचे नेते, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. खोत यांनी यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, महाराष्ट्रात विचार स्वातंत्र्य आहे की नाही ? जराशी टीका केली सरकारवर तर लोकांना लगेच जेल चा रास्ता दाखवतात.. का ? अग्रलेखातून रोज गरळ ओकणाऱ्या संपादकांना रोज अटक का होत नाही मग ?

गजारिया यांनी ४ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक ट्‌विट केले होते. गजरिया याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी देखील आक्षेपार्ह ट्‌विट करुन ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग केले होते. त्याचबरोबर त्याने दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, कॉंग्रेसच्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांविरुद्ध बदनामीकारक मजकुर ट्‌विटरवर प्रसिद्ध केला होता.

गजारिया यांच्या माफीनाम्यात त्यांनी ट्विट करताना भाषेच्या मर्यादेचे उल्लंघन केल्याचे मान्य केले.ही भाषा महिलांना आक्षेपार्ह आहे, त्यामुळे मी माफी मागतो. ही भाषा असभ्य आणि अपमानास्पद असल्यामुळे ट्विट डिलीट करत आहे आणि भविष्यात मी अशी भाषा वापरणार नाही, अशी कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली आहे.

विनाकारण रस्त्याने चालताना दिसला तर त्याला थेट ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल. याशिवाय मास्कशिवाय कोणी थुंकताना दिसल्यास त्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असा नियम ठाकरे सरकारने केला आहे. यावरून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“हे म्हणजे असे झाले आहे की, नेमेचि येतो कोरोना, जाचक नियमाखाली कुणी का मरेना! कोरोनासंदर्भात अटी व नियम हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे असावेत. पण चुकीचे निर्णय घेण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. कधी तरी जनतेवर भार टाकण्याआधी संवेदशीलतेने विचार करा.” असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT