Rohini Khadse on Tushar Bhosale : सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता जोपासणाऱ्या वारकरी संप्रदायात घुसलेल्या हिंदुत्ववादी धर्मांध प्रवृत्तींवर सडकून टीका करणारा लेख राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एका स्मरणपत्रिकेत लिहिला असून यावरुन भाजपनं त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. भाजपचे आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी आक्षेपार्ह शब्दांत शरद पवारांवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला आता 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
दिल्लीमध्ये सध्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचं साहित्य संमेलन सुरु आहे. या संमेलनानिमित्त एक स्मरणिका तयार करण्यात आली आहे. 'सौदामिनी' नावाच्या या स्मरणिकेत मान्यवारांचे लेख छापलेले आहेत. यामध्ये शरद पवारांही एक लेख आहे. 'महिलांचे सक्षमीकरण हेच माझं स्वप्न' या शिषर्काखाली त्यांनी लेख लिहिला आहे.
या लेखामध्ये त्यांनी सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात महिलांचं प्रमाण कमी असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या भक्ती पंरपरेतील महत्वाच्या वारकरी संप्रदायात घुसलेल्या काही अनिष्ठ गोष्टींवरही प्रहार केला आहे. "वारकरी हे भोळेभाबडे आहेत, त्यांच्यामध्ये धार्मिक कट्टरता पसरवण्याचं काम काही वर्षांपासून पद्धतशीरपणे सुरु आहे. वारकरी संप्रदाय हा पुरोगामी असताना त्यात प्रतिगाम्यांची घुसखोरी झाल्याचंही पवारांनी या लेखात म्हटलं आहे. वारकरी संप्रदायात घुसून धर्मांधतेला बळ देणाऱ्या अशा ६० धर्मांध लोकांची यादीच आता आम्ही तयार करत आहोत" याद्वारे वारकऱ्यांमध्ये घुसलेल्या प्रतिगाम्यांविरोधात मोठी चळवळ उभारण्याचे संकेतच शरद पवार यांनी दिले आहेत.
शरद पवारांच्या लेखातील या भूमिकेवर तुषार भोसले यांनी ट्विट करुन आगपाखड केली आहे. त्यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका करताना म्हटलं, "अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या झोडता, ते तुम्हाला धर्मांध वाटत नाहीत. पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला? तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केलीत आणि आता ४०-५० लोकांची टोळी त्याच्यासाठी तयार केली आहे. पण एक लक्षात ठेवा, हा तुषार भोसले जोपर्यंत जिवंत आहे, तुमचं षडयंत्र मी यशस्वी होऊ देणार नाही"
तुषार भोसले यांनी शरद पवारांवर आक्षेपार्ह टीका केल्यानं रोहिणी खडसेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणतात, "भाजपने हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय? जो स्वतःच स्वतःला 'आचार्य'ची पदवी लावतो. याला आचार्यची पदवी दिली कोणी? याचा आधी तपास व्हायला हवा. खरंतर शरद पवारांनी अशाच लबाड लांडग्यांवर टीका केली आहे. जे वारकरी संप्रदायाचं पांघरूण घालून समाजा-समाजात, जातीपातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करतात. मागे एकदा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर वारकरी संप्रदायाचा आडोसा घेऊन संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने नथुराम गोडसे होऊन हत्या करण्याची धमकी दिली होती.
या विचाराला वारकरी संप्रदायात स्थान नाही आणि तरीही वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन कोणी द्वेष, व्याभिचार पसरवत असेल तर त्याला तिथे रोखण्याचं काम आम्ही संत मुक्ताबाई, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे वारस म्हणून करू. कारण आम्ही पिढ्यानपिढ्याचे वारकरी आहोत. तुषार भोसले, संग्राम भंडारे यांसारख्या वारकरी संप्रदायाला बदनाम करणाऱ्यांना संत तुकाराम महाराजांच्या भाषेत एकच सांगणं आहे.
"ऐसे जन बोलती ज्ञानी।
अंतरी नाही ठायीं पाणी।।"
राम कृष्ण हरी 🙏🏻
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.