yogi adityanath
yogi adityanath 
महाराष्ट्र

राऊतांसारखाच शब्द वापरणाऱ्या योगी आदित्यनाथांवर भाजप गुन्हा दाखल करणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासाठी खुर्ची घेऊन जातानाचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या फोटोची चांगलीच चर्चा झाली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. या टीकेनंतर संजय राऊतांनी 'ही चू**** बंद करा' असे विधान करत भाजपला उत्तर दिले होते. याप्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिल्लीच्या मंडावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)यांनी अशाच प्रकारचा शब्दाचा प्रयोग केला होता. त्यामुळे यावर राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांनी योगी आदित्यानाथांवर टीका केली आहे. मलिक माध्यमांशी बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले, ''योगी आदित्यनाथ यांनी देखील त्या शब्दाचा प्रयोग केला होता. त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हा भाजप कधी दाखल करणार हा प्रश्न आहे. माझं आव्हान आहे की ज्या पत्रकाराला त्यांनी शब्द वापरला आहे त्याने याविरोधात तक्रार दाखल करावी,''

दिल्लीत पत्रकारांशी बोलताना भाजप नेते चू**** आहेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी दोनदा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. मुंबई भाजप महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर-देसाई यांनी ही तक्रार नोंदविली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ ए (१) व (४), ५०९, ५०४, ५०० नुसार सुयोग्य गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी त्यात केली आहे.

दिल्लीत गुन्हा दाखल झाल्यानंतर राऊत यांच्या मदतीला काँग्रेसचे नेते सचिन सावंत धावून आले आहेत. त्यांनी ट्विट करून एक शब्दकोश दाखवला असून त्यात राऊतांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. 'संजय राऊत यांच्यावर भाजपा महिलांनी गुन्हा दाखल केला, का तर त्यांनी एक शब्द वापरला! जरी सदर शब्दाचा वापर मी करत नाही तरी अज्ञानी भाजपाच्या प्रबोधनासाठी मराठी लेखक व शब्दकोशकार कै. श्रीपाद जोशी यांच्या १९५७ पासून प्रकाशित अभिनव शब्दकोशातील तोच शब्द व अर्थ देत आहे, असे नमूद करत सावंत यांनी शब्दकोशच दाखवला आहे.

राऊतांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ शब्दकोशामध्ये मुर्ख, बुध्दू असा सांगण्यात आलेला आहे. हा शब्दकोश दाखवत सावंतांनी राऊतांची जणू पाठराखणच केली आहे. तसेच भाजपला टोला लगावला आहे. त्यामुळे आता सावंत यांच्या या प्रत्युत्तरला भाजप कसं उत्तर देणार, हे औत्सुक्याचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT