मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महापालिकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीच्या कलांमध्येच राजकीय समीकरणे स्पष्ट होऊ लागली आहेत. पहिल्या फेऱ्यांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने आघाडी घेतल्याचे दिसत असून ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेससाठी हे कल चिंताजनक ठरत आहेत.
राज्यभरातील निकालांकडे पाहिले असता भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपचे जवळपास ४०० नगरसेवक आघाडीवर असून शिंदे गटाच्या शिवसेनेचे सुमारे १०० उमेदवार आघाडीवर आहेत. याउलट ठाकरे गटाची शिवसेना आणि काँग्रेसला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही.
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सोलापूर यांसारख्या मोठ्या महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबईत निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईत ठाकरे गटाची शिवसेना काही भागात चांगली लढत देताना दिसत असली, तरी महायुती एकूणच पुढे असल्याचे सुरुवातीच्या कलांमधून स्पष्ट होत आहे. मुंबईत ठाकरे गट 64 जागांवर तर महायुती 85 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
सविस्तर आकडेवारी पाहिली, तर मुंबईत भाजप 70 जागांवर आघाडीवर आहे. ठाकरे गटाची शिवसेना 57 जागांवर आघाडीवर असून शिंदे गटाची शिवसेना 15 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 11 जागांवर आघाडीवर आहे, तर मनसेचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आघाडीवर आहे.
पुणे, नागपूर, नाशिक आणि पिंपरी-चिंचवडमध्येही भाजप आघाडीचा प्रमुख पक्ष ठरत असल्याचे संकेत आहेत. शहरी मतदारांमध्ये भाजपला मिळणारा पाठिंबा यावेळी अधिक मजबूत झाल्याचे या सुरुवातीच्या कलांवरून दिसून येत आहे. अर्थात, ही केवळ सुरुवातीची आकडेवारी असून अंतिम निकालांच्या आकड्यावर बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.