Local Body Election : मुंबई महापालिकेत ठाकरे बंधु एकत्र येणार की भाजपसोबत राज ठाकरे घरोबा करणार याची चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार की दोन्ही राष्ट्रवादीमध्ये समजतो होणार याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर या सर्व चर्चांना शरद पवार यांनी पूर्ण विराम देत स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबईत संकल्प शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, 'महानगरपालिकेच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचं आहे. साधारणतः यासंबंधीची पक्षाची काय नीती असावी ह्यावर आम्ही काही लोक चर्चा करत आहोत. त्या त्या शहरांमध्ये, त्या त्या जिल्ह्यामध्ये तिथली जी संघटना आहे आणि संघटनेचे जे सहकारी आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि निवडणुकीला सामोरे जाण्याचा कोणता मार्ग अधिक योग्य आहे याचा विचार करावा.'
शरद पवार म्हणाले, 'मुंबईमध्ये आपल्याला या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि ते सामोरे जात असताना आपल्याला कुणाशी युती करायची आहे का? की तुम्हाला स्वतंत्र लढायचं आहे ? याबद्दलचा निर्णय तुम्ही लोकांनी बसून घ्यायचा आहे.' पवारांनी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची की मित्रपक्षांसोबत याबाबत निर्णय घेण्याचे अधिकारी स्थानिक पक्ष संघटनेला दिले आहेत.
पवार म्हणाले, 'निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना जनमानसामध्ये प्रतिष्ठा देण्यासाठी आणि नवं नेतृत्व तयार होण्यासाठी आम्ही स्वतंत्र लढू इच्छितो आणि ही मानसिकता तुम्हा सर्वांची असेल तर पक्ष त्याचा विचार करेल.'
'तुम्हाला जर असं वाटलं समविचारी लोकांबरोबर आपण बसावं आणि जागांची वाटणी करावी तर त्यालाही आम्हा लोकांची संमती राहणार आहे आणि म्हणून लवकरच बसून उद्याचं धोरण काय असावं याचा विचार तुम्ही करा. तुमची सूचना आम्हाला द्या. त्याप्रमाणे या निवडणुकीला तुम्हा सगळ्यांना कशी संधी देता येईल हे पक्षाचे नेतृत्व ठरवेल. ', असे देखील पवार यांनी सांगितले
मुंबईच्या निवडणुकीत देशाचं लक्ष लागणार आहे. कारण मुंबई ही देशाला दिशा दाखवते. मुंबई ही सर्व राज्य, सर्वभाषिक, सर्वधर्मीय या सर्वांचा संमेलन असणारी नगरी आहे. त्यामुळे साहजिकच एकंदर जे राजकीय चित्र असतं त्याचे परिणाम मुंबईवर बघायला मिळत असतात, असे देखील पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.