कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरकरांशी मिसळ कट्ट्यावर थेट संवाद साधणार आहेत.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत. ते मनसेच्या उमेदवारांसोबत संवाद साधणार आहेत. सकाळी ९.४५ ते संध्याकाळी ४.४५ पर्यंत राज ठाकरे उमेदवारांना भेटी देणार आहेत.
भाजपचे बंडखोर उमेदवार मुकेश शहाणे यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांनी त्यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली. दिपक सुधाकर बडगुजरांविरोधात प्रभाग 29 मध्ये मुकेश शहाणे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. पक्ष शिस्त न पाळल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.
काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले केरळचे आमदार राहुल ममकुटाथिला याला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीवर अत्याचार प्रकरणार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. तीन हजार रुपयाचे पाकीट भाजप दशरथ भुवन परिसरात वाटत असल्याचे शिंदेंच्या सेनेचे उमेदवार नितीन पाटील यांनी केला, पाटीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना रंगेहाथ पकडले.
मतदानासाठी तीन दिवस बाकी असताना एकनाथ शिंदेंनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपचे जालन्याचे माजी नगराध्यक्ष सुनील आर्दड यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.