मुंबई महापालिका
एकूण जागा २२७
भाजप - ८९
शिवसेना (एकनाथ शिंदे) - २९
शिवसेना (उद्धव ठाकरे) - ६५
राष्ट्रवादी (शरद पवार) - ०१
राष्ट्रवादी (अजित पवार) ०३
काँग्रेस - २४
मनसे - ०६
एमआयएम - ०८
इतर पक्ष - २
अपक्ष - ०
महापौर - भाजप-शिवसेना
ठाणे -
महापालिका
एकूण जागा १३१
भाजप - २८
शिवसेना (एकनाथ शिंदे) - ७५
शिवसेना (उद्धव ठाकरे) - ०१
राष्ट्रवादी (शरद पवार) - १२
राष्ट्रवादी (अजित पवार) - ०९
काँग्रेस - ०
मनसे - ००
एमआयएम - ०५
इतर पक्ष - ०
अपक्ष - ०१
महापौर - शिवसेना-भाजप
काल मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाला. यानिकालात २२७ पैकी भाजपला ८९ तर शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या. तर ठाकरेंची शिवसेना ६५ आणि मनले ६ जागांवर विजयी झाली. त्यामुळे आता महापालिकेत महायुतीची निर्विवाद सत्ता आली आहे. त्यामुळे ठाकरेंचे पालिकेवरील वर्चस्व गेलं आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आणि आयोगाच्या भूमिकेवर सामनातून टीकास्त्र डागलं आहे. सामनात लिहिलं की, 'संपूर्ण निकाल येण्याआधीच भाजपने सुरू केलेला जल्लोष हा निवडणूक घोटाळ्याचाच भाग आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी हा धोक्याचा इशारा आहे. सत्ता, पैसा आणि निवडणूक आयोग हरकाम्याची भूमिका बजावत असेल तर निवडणुकीत कोणाही ऐऱ्यागैऱ्याची लाट येऊ शकते. या लाटांना आणि लहरींना काहीच अर्थ नसतो. मुंबईसह 26 महानगरपालिकांत भाजपची लाट आली व त्या लाटेवर ‘शहासेना’सारखे ‘हवशे-गवशे’ किनाऱ्याला लागले. मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुंबईत ‘अदानी’धार्जिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपने पाहिले. ते पिसाळ, खोपड्यांची अवलाद मिंध्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने कायमची लिहिली जाईल. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मराठी माणसाने मिळवलेल्या मुंबईचा घास शिंद्यांसारख्या मिंध्या माणसाच्या बेइमानीमुळे हातचा जाण्याची वेळ आली, पण आम्ही ते होऊ देणार नाही, असंही सामनात म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांचा निकाल स्पष्ट झाला असून राज्यातील 24 महानगरपालिकांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
मुंबई -
मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महायुतीने बहुमताचा टप्पा पार केला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड -
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपने आपली सत्ता आणली आहे.
नागपूर -
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ल्या असलेल्या नागपुरात भाजपने आपली एकहाती सत्ता आणली आहे.
ठाणे : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपने आपले गड राखलेत.
संभाजीनगर : भाजप येथे पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून एमआयएमने दुसऱ्या क्रमांकावर आहे.
राज्यभरातील महापालिकांचा निकाल स्पष्ट झालं असून राज्यभरातील जवळपास ८३ टक्के महापालिकांमध्ये भाजपने मित्र पक्षांच्या मदतीने सत्ता मिळवली आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.