Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Updates : मुंबईतील उमेदवारांना प्रत्येकी 5 कोटी देण्याची कामगिरी शिंदेंच्या पक्षाने बजावली, राऊतांचा गंभीर आरोप

Maharashtra PoliticalNews : राज्यभरातील 29 महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. निकालानंतर महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी होणार आणि कुणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, यासह आज रविवार 18 जानेवारी रोजीच्या राजकीय अपडेट्स जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

आमदार अब्दुल सत्तार यांना न्यायालयाची नोटीस

विधानसभेला मतदान न करणाऱ्यांना जाहीर सभेतून इशारा वजा धमकी दिल्या प्रकरणी शिंदेंसेने आमदार अब्दुल सत्तार यांना सिल्लोड येथील प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायालयात हजर राहून सत्तार यांनी आपली बाजू मांडावी, असे नोटीसीत म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती - संजय राऊत

शिंदेंना त्यांचे नगरसेवक भाजप फोडेल, अशी भीती आहे. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांना हाॅटेलमध्ये ठेवले आहे. उपमुख्यमंत्री असलेल्या शिंदेंचे नगरसेवक सुरक्षित नाहीत.

अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईतील उमेदवारांना प्रत्येकी 5 कोटी देण्याची कामगिरी शिंदेंनी बजावली - राऊत

मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या निकालावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या सामनातील सदरातून भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या सर्व महापालिकांच्या निवडणुकीत हरामाचा पैसा वापरला आणि सत्तेतल्या तिन्ही पक्षांकडे हा पैसा होता. आणि याच भ्रष्ट पैशांवर भाजपने मुंबई अदानींच्या घशात घातली, अशा शब्दात राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर प्रहार केला आहे. महापालिका निवडणुकीत शिंदे व त्यांच्या लोकांकडे ‘कॅश’ म्हणजे रोखीची चणचण भासली व फडणवीस यांना तेच हवे होते. हे खरे असले तरी मुंबईतील त्यांच्या उमेदवारांना प्रत्येकी 5 कोटी व इतर महानगरपालिकांत 2 कोटी देण्याची कामगिरी शिंदे यांच्या पक्षाने बजावली. मुख्यमंत्र्यांनी 40 हजार कोटींची कामे थांबवली ही शिंदे यांच्या आर्थिक उलाढालीतील लहान घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातही आता अमली पदार्थांच्या व्यवहाराचा पैसा पसरला आहे. याच पैशांनी ‘मतदार’ विकत घेतला जातो. हे सर्व भयंकर आहे. नशेच्या गोळ्या व नशेचा पैसा सत्ताधारी घरापर्यंत पोहोचवत आहेत. मग आता राहिले काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

Sangli News : खासदार विशाल पाटील यांचे पुतणे वयाच्या 23व्या वर्षी बनले नगरसेवक

वसंतदादाचे पणतू, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांचे चिरंजीव आणि खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी नगरसेवक बनले आहेत. सांगली मधील प्रभाग 11 मधून ते विजयी झाले आहेत.

Omar Abdullah : काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला मुंबई दौऱ्यावर

काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुलला आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते टाटा मुंबई मॅरेथॉन २०२६ मध्ये सहभागी होणार आहेत.

Amravati Mahangarpalika : अमरावतीत महापौरपदासाठी काँग्रेसच्या हालचाली सुरू

अमरावतीत भाजप सध्या युवा स्वाभिमान सोबत जाणार असल्याचं चित्र असलं तरी बहुमताचा आकडा 44 आहे. भाजप आणि युवा स्वाभिमानच्या जागा मिळून 40 होत आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी अजून 4 जागांची गरज आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन महापौर बसवण्याचा तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.

Navi Mumbai Election : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गणेश नाईकांना फोन

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता नवी मुंबई भाजपची सत्ता आली आहे. नवी मुंबईची जबाबदारी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईकांना फोन करत त्यांचं अभिनंदन केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT