Chhatrapati Sambhaji Nagar news : तब्बल दहा वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या कसेबसे पक्षाकडून तिकीट मिळवले. विरोधक पक्षांतर्गत गटबाजी नाराजीचा सामना करत विजयश्री खेचून आणली. महापालिकेचे सुसज्ज आणि चकचकीत सभागृह नव्या नगरसेवकांची आतुरतेने वाट पाहत आहे. परंतु सभागृहात येण्यापूर्वीच काही नगरसेवकांच्या विरोधात तक्रारी सुरू झाल्या आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या तिसऱ्या अपत्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधक ॲक्टिव झाले असून त्यांनी अशा नगरसेवकांचा शोध घेत त्यांच्या विरोधात तक्रारींचा सूर आळवायला सुरुवात केली आहे.
महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत तानातानी झाल्यानंतर स्वबळावर लढलेल्या शिवसेना-भाजपने जिल्हा परिषदेसाठी मात्र जुळवून घेतले आहे. 63 पैकी 52 जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले असून भाजप 27 तर शिवसेना 25 जागांवर लढणार आहेत. दोन दिवसांपासून शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. अखेर आज युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असले तरी 11 जागांचा तिढा कायम आहे. परंतु त्यावर अडून न बसता हा निर्णय राज्य पातळीवरील नेतृत्वावर सोडून स्थानिक नेत्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हिवरखेड नगरपरिषदेत बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी भाजपकडून महिला उमेदवार म्हणून अनिता वाकोडे आहेत. तर त्यांच्या नामनिर्देशित अर्जाच्या सूचकामध्ये काँग्रेसचे नगरसेविका रुबिजा अब्दुल सलमान आणि एमआयएमचे नगरसेवक आजम खान सुभेदार खान यांचं नाव अनुमोदक म्हणून नाव आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मिरा भाईंदरच्या पालिकेवर मराठीच महापौर झाला पाहिजे असा थेट दिशा दिला आहे. मराठी एकीकरण समितीने काढलेला मोर्चा मीरा-भाईंदर शहरातील लोकांना माहितच आहे. आमच्या नाकावर ठेचून जर परप्रांती महापौर बसवण्याचा प्रयत्न केलात तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र दोन यानिमित्ताने मोठा लढा शहरामध्ये उभा राहील. आम्ही मराठी महापौर पदासाठी ठाम आहोत कोणी माजुर्डेपणा करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मधील शिवसेना ठाकरे गटाचे ११ पैकी ७ नगरसेवक कोकण भवन येथे दाखले . ९ नगरसेवक पैकी स्वप्नाली केणे आणि राहूल कोट अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे आधीच ११ पैकी दोन नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असताना आता ९ पैकी परत दोन नगरसेवक स्वप्नाली केणे आणि राहूल कोट संपर्काच्या बाहेर आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे
अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपची थेट ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर' दिल्याची माहिती समोर येत आहे. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याची गळ घातली जात आहे. भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची काल अकोल्यात एक गुप्त बैठक देखील झाल्याचे समजते. ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपकडे उपमहापौरपद अन् स्थायी समितीच्या सभापतीची मागणी केल्याचे समजते. ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला महापालिकेत 6 नगरसेवक आहेत. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजप चर्चा करत आहे. अकोल्यात 21 जागा जिंकणारी काँग्रेस सत्तेसाठी सर्वच पर्यांयावर करते आहे.
राज्यात महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जोर धरत आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन, 'ईव्हीएम हटाव देश बचाओ', अशी घोषणाबाजी केल्याने चांगलाच गोंधळ उडाला.
30 जानेवारी पर्यंत पुणे महापालिकेचे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक सादर होणार आहे.
2026-2027 या आर्थिक वर्षासाठीचे बजेट 30 तारखे पर्यंत सादर केले जाणार आहे.
रस्ते, पाणी, स्वच्छता या विषयांना या बजेट मधून प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
अंदाज पत्रक स्थायी समितीकडे पाठवल्यानंतर त्याला अंतिम मंजूरी मिळाल्यावर ते सर्व साधारण सभेत मांडले जाते मात्र यंदा निवडणुकीमुळे ते सदर होऊ शकलेले नाही.
आमच्या संपर्कात भाजपचे नगरसेवक असल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेसचा दावा योग्य आहे, कारण आमचे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत अशी मुनगंटीवार यांनी उपहासात्मक खिल्ली उडवली.
भाजपचा महापौर करण्यासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना आमचे नगरसेवक आग्रह करीत आहेत.
परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र हे भारताचे प्रमुख प्रवेशद्वार असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र भारताच्या आर्थिक भविष्याचा कणा ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दावोस दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी १४.५ लाख कोटी रुपयांचे १९ सामंजस्य करार झाले असून, यामुळे राज्यात सुमारे १५ लाख नवीन रोजगारनिर्मिती होणार आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेसेना सर्वात मोठा पक्ष ठरली असली तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे महापौरपदाचा तिढा कायम आहे. भाजपने महापौरपदाची ठाम मागणी करत योग्य मान-सन्मान न मिळाल्यास विरोधात बसण्याचा इशारा दिला आहे. याचवेळी विरोधी पक्षनेतेपदासाठीही चुरस वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसला कागलमध्ये धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांनी बंडखोरी केली आहे. तिकीट न मिळाल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकी निवडून आलेले काँग्रेसचे २४ नगरसेवक कोकण भवनात दाखल झाले आहेत. पक्षाचा गट म्हणून नगरसेवकांकडून नोंदणी केली जाणार आहे.
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नवनियुक्त नगरसेवकांना दहा दिवसांत दहा कोटींचा विकासनिधी देण्याचे आश्वासन दिले आहे. नगरसेवकांशी संवाद साधताना त्यांनी नगरसेवकांना शब्द दिला.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडून आलेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल असल्याचे समोर आले आहे. पक्षाच्या नेत्यांनीही याची कबुली दिली आहे. जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण देत दोघांवर कारवाईचेही संकेत दिले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड करण्यात आली आहे. आज त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी कार्यकर्ता आणि नितीन नबीन माझे बॉस आहेत. आपल्या पक्षात नेतृत्व बदलते पण दिशा बदलत नाही. अध्यक्ष बदलतात पण आदर्श बदलत नाहीत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे राज ठाकरे 23 जानेवारीला षण्मुखानंद सभागृहात एकत्र येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात मोठ्या घडामोडी घडत आहे. जिल्हा परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माजी आमदार पोपटराव गावडे आणि त्यांचे पुत्र राजेंद्र गावडे शेकडो कार्यकर्त्यां सह भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने नाशिक महापालिकेला पुन्हा दणका दिला आहे. तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला २० फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतेही झाड तोडू नये हरित लवादचे स्पष्ट निर्देश दिले आहे. पुढील सुनावणीपर्यंत वृक्षतोडीवर तात्पुरती बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
नागपुरातील कामठी तालुक्यातील येरखेडा नगरपंचायतमध्ये सत्ता स्थापनेनंतर अवघ्या काही दिवसांतच भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून पक्षातील दोन गटांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले असून, हे मतभेद थेट हाणामारीपर्यंत पोहोचले आहेत.
ऐन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तसेच ओबीसी नेते संतोष जैतापकर यांनी सोमवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
मिरा भाईंदर शहरात झालेल्या मराठी-अमराठी वादाचा फायदा ठाकरे गटाला व मनसेला झाला तर हिंदी मुस्लिम वादाचा लाभ भाजपला असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे गटाने केलेल्या मत विभागणी मुळे शिवसेनेला तब्बल २४ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर सरनाईक यांनी हे मत व्यक्त केले.
बाळाभाऊ भेगडे आणि गणेश भेगडे यांना ना भाजपमध्ये कोण विचारतं? जर त्यांना खरंच विचारत असतील तर मला जिल्हाध्यक्ष, भाजपचे प्रदेशाध्यक्ष का फोन करतात? मला मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयातून का फोन येतात? फडणवीस साहेबांकडे तुम्हीही जाता, मीही जातो बघू कुणाला किती किंमत आहे, असं म्हणत आमदार सुनील शेळके यांनी बाळा भेगडेंवर हल्लाबोल केला आहे. शिवाय हे जे काही चाललंय, दाखवायचं-करायचं बंद करा, असा इशारा देखील दिला आहे.
16 जानेवारीला अकोल्यात भाजपच्या दोन गटांत राडा झाला होता. यामध्ये भाजपचे प्रभाग क्रमांक 2 ब मधील नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकरांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर नितीन राऊतसह आणखी एकाला अटक केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.