Maharashtra Political Live updates Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update: दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra PoliticalNews : आज 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. यासह आज गुरूवार २२ जानेवारी रोजीच्या विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्युरो

मुंबईच्या जुहू चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफर कडून पर्यटकावर हल्ला

मुंबईच्या जुहू चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफरकडून पर्यटकावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये पर्यटक गंभीर जखमी झाला आहे. फोटोग्राफर आणि पर्यटकांचा हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत सांताक्रुझ पोलिसांनी मारहाण करणारा फोटोग्राफरची चौकशी सुरू केली. मुंबईच्या जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी मोठ्या संख्यानं वेगवेगळ्या भागातून पर्यटक येत असतात. मात्र, चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफर पर्यटकांचे फोटो काढतात. यावेळी काही फोटोग्राफरकडून पर्यटकांसोबत दादागिरी आणि हाणामारी करण्याच्या देखील घटना घडतात. त्यामुळे जुहू चौपाटीवर दादागिरी करणाऱ्या फोटोग्राफर विरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जुहू चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Jitendra Awahad : जितेंद्र आव्हाड यांना धक्का; राजकीय घडामोडींना वेग

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने वर्चस्व गाजवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतर महापौर पदाच्या मुद्यावरुन पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हड यांना मोठा धक्का बसला आहे. कळव्यातील अपक्ष नगरसेविका प्रमिला केणी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. प्रमिला केणी यांनी राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांचा प्रचार स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

अनुसूचित जमाती

अनुसूचित जमाती

- कल्याण-डोंबिवली

अनुसूचित जाती

- ठाणे

- जालना (महिला)

- लातूर (महिला)

नागरिकांचा मागास प्रवर्ग

- पनवेल

- इचलकरंजी

- चंद्रपूर (महिला)

- जळगाव (महिला)

- अकोला (महिला)

- अहिल्यानगर (महिला)

- उल्हासनगर

- कोल्हापूर

खुला महिला

- पुणे

- मुंबई

- नांदेड

- मालेगाव

- नवी मुंबई

- नाशिक

- मीरा भाईंदर

- नागपूर

- धुळे

खुला

- छत्रपती संभाजीनगर

- अमरावती

- पिंपरी- चिंचवड

- परभणी

- भिवंडी-निजामपूर

- सांगली

- सोलापूर

- वसई-विरार

महाराष्ट्रातील 29 महापालिका महापौर आरक्षण सोडत जाहीर

1. छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण (महिला)

2. नवी मुंबई: सर्वसाधारण

3. वसई- विरार: सर्वसाधारण

4. कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती

5. कोल्हापूर: ओबीसी

6. नागपूर: सर्वसाधारण

7. बृहन्मुंबई: सर्वसाधारण

8. सोलापूर: सर्वसाधारण

9. अमरावती: सर्वसाधारण (महिला)

10. अकोला: ओबीसी (महिला)

11. नाशिक: सर्वसाधारण

12. पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण

13. पुणे: सर्वसाधारण

14. उल्हासनगर: ओबीसी

15. ठाणे: अनुसूचित जाती

16. चंद्रपूर: ओबीसी (महिला)

17. परभणी: सर्वसाधारण

18. लातूर: अनुसूचित जाती (महिला )

19. भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण

20. मालेगाव: सर्वसाधारण

21. पनवेल: ओबीसी

22. मीरा- भाईंदर: सर्वसाधारण

23. नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण

24. सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण

25. जळगाव: ओबीसी (महिला)

26. अहिल्यानगर: ओबीसी (महिला)

27. धुळे: सर्वसाधारण (महिला)

28. जालना: अनसूचित जाती (महिला)

29. इचलकरंजी: ओबीसी

पुणे मुंबईसह या ९ महापालिकांवर खुला महिला प्रवर्गातून महापौर 

पुणे

मुंबई

नांदेड

मालेगाव

नवी मुंबई

नाशिक

मीरा भाईंदर

नागपूर

धुळे

खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नऊ महापालिका

खुला महिला-

पिंपरी-चिंचवड, भिवंडी, छत्रपती संभाजीनगर, पुणे, धुळे, मुंबई, नवी मुंबई, नांदेड, मालेगाव

१७ महापालिका खुल्या प्रवर्गातून महापौर

मुंबई

पुणे

अमरावती ( महिला)

नवी मुंबई

पिंपरी-चिंचवड

सांगली

सोलापूर

संभाजी नगर

परभणी

नाशिक

नागपूर

आठ महापालिकांमध्ये ओबीसी महापौर

आठ महापालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार आहे. इजलकरंजी, पनवेल, अकोला, अहिल्यानगर, कोल्हापूर, जळगाव, चंद्रपूर

ठाणे, जालना अनुसूचित जातीसाठी राखीव

ठाणे, जालना अनुसूचित जातीसाठी महापौर पद राखीव जाहीर करण्यात आले आहे. लातूरमध्ये देखील अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. या तीन पैकी लातूर आणि जालना महापालिकेत एससी महिला प्रवर्गासाठी राखीव झाली आहे.

एससी आरक्षण तीन ठिकाणी

: ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई-विरार जळगाव आणि चंद्रपूर या 5 पैकी एका ठिकाणी ST साठी सोडत निघणार होती. यातील कल्याण-डोंबिवली येथे ST आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. जळगाव, चंद्रपूर, संभाजीनगर, ठाणे, धुळे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, पुणे, मालेगाव, भिवंडी, लातूर आणि वसई विरार या 12 पैकी 3 ठिकाणी SC आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. यापैकी 2 पदे महिलांसाठी राखीव असणार आहेत.

महापालिका महापौर पदाचे आरक्षण जाहीर

29 महापालिकांतील आरक्षण

SC - 3

ST - 1

OBC - 8

OPEN - 17

महापौरपद आरक्षण सोडतीला सुरुवात

महापौरपद आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे. 29 महापालिकांचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहेत. 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे. कल्याण-डोंबिवली महापौर एसटीसाठी राखीव

मुंबईत काही होऊ शकते - बाळा नांदगावकर

केडीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठींबा देणारी मनसे मुंबईत देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याची चर्चा आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले, केडीएमसी प्रमाणे मुंबईत देखील काहीही घडू शकते.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा उमेदवार बिनविरोध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभाववाडीमध्ये भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. बकोकीसरे मतदारसंघातून भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या पत्नी साधना सुधीर नकाशे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे भाजपने वैभववाडी पंचायत समितीत आपले खाते उघडले.

मुळशीत बंडखोरी, अनिल पवार ठाकरेंचे उमेदवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल पवार यांनी भूगाव गणात बंडखोरी केली आहे. ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत.

दावोसवरून आल्यावर महाराष्ट्रातले अनेक राजकीय MOU बाकी आहेत - उदय सामंत

महापौरपदांच्या निवडीपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे आणखी किती नगरसेवक नॅाट रिचेबल राहतील हे पाहा, दावोसवरून आल्यावर महाराष्ट्रातले अनेक राजकीय MOU बाकी आहेत, असं वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. ते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दावोस दौऱ्यावर आहेत.

पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे हडपसरचे उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला

शिवसेनेचे हडपसरचे उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यासह आणखी दोन जणांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उल्हास तुपे यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यामागे राजकीय कारण असल्याचं बोललं जात आहे. या हल्ल्यात शिवसेनेचे पुणे शहर उपसंघटक दीपक कुलाळ गंभीर जखमी झालेत. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून राष्ट्रवादी नेते उल्हास तुपे यांनी दगडफेक केली आणि मुलानी शस्त्राने हल्ला केल्याचा आरोपही दीपक कुलाळ यांनी केला आहे.

वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप

आताच्या पुणे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार वसंत मोरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला आहे. पालिका आयुक्तांना दिलेली आकडेवारी आणि मतमोजणीच्या आकडेवारीत फरक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाने सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

मंत्री उदय सामंतांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या रिंगणात

उद्योग मंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक नेताजी पाटील हे पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहेत. कसोप पंचायत समिती गणामधून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

युती असती तर ७० जागाही आल्या नसत्या - गिरीश महाजन

नाशिक महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना गिरीश महाजन म्हणाले, भाजपाला महापालिका निवडणुकीत बहात्तर जागा मिळाल्या. युती केली असती तर ७० जागा ही निवडून आल्या नसत्या.

महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आज फैसला होणार

राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर या सोडतीला प्रारंभ होणार असून 50 टक्के महिला आरक्षणाचे नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिला महापौर तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT