Mumbai News : मराठी माणूस हा त्यांच्या प्रचाराचा मुखवटा आहे, त्यांना मराठी माणसाची काळजी आहे म्हणून ते सोबत नाहीत. तीन वर्षापूर्वीच्या मिळकतीत काही बदल झाला नाही, त्यांची सत्ता येणार नाही हे 100 टक्के आहे. मुंबईत सत्ता महायुतीची येणार आहे. मराठीसाठी यांनी काय केलं? राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्यासोबत जाऊन आनाडी नाहीत. आज मनसेतून लोक बाहेर पडत आहेत, पण मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी हे चाललं आहे, असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे.
कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारजण, आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
पुणेकर साथ देणार नाहीत, म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यात ठाण मांडून आहेत. ते त्यांचे प्रयत्न करत आहेत. आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत. महापलिकेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे तो आक्रमकपणे सुरू आहे.
ते प्रत्येक ठिकाणी सांगतात की माझ्यावर सगळे मिळून टीका करायला लागले आहेत. टीका करायला आम्हाला वेळ नाही. चोराला चोर म्हटलं तर कोणाला वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे. नांदेड महापालिका क्षेत्रातील सर्व जागा बिल्डरांच्या घशात कोणी घातल्या, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजं. टीका आपोआप बंद होईल. भावनिक व्हायचं, अशी त्यांची नेहमीची चाल आहे. पण आम्हाला कोणावर टीका करायला अजिबात वेळ नाही, असा टोला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर केला.
मुंबईत महापौर हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बसणार आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही समजलं आहे, त्यामुळे मुंबईतील त्यांची सभा रद्द झाली आहे. मुंबईत काही बदल होणार नाही, हे त्यांना कळलं आहे. मुंबई ही मराठी माणसांकडे आणि ठाकरेंकडेच राहणार आहे, असा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे.
अंबरनाथमधील काँग्रेसचे १२ नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याचे समर्थन करताना ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर आरोप केले. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आम्ही शहर विकासाला साथ दिली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी कोणत्या प्रकारे विचारात न घेता आमच्यावर निलंबनाची कारवाई केली. आम्ही कोकणात काँग्रेस वाचवली होती. विशेषतः ठाणे जिल्ह्यात काँग्रेसला स्थान मिळवून दिलं होतं. पण प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आमचं साधं अभिनंदनसुद्धा केलं नव्हतं. प्रदेशला बोलावून सत्कारसुद्धा केला नव्हती, अशी खंत भाजप प्रवेश केलेले काँग्रेसचे प्रदीप पाटील यांनी व्यक्त केली.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी न मिळाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार दगडू सपकाळ हे नाराज झाले आहेत. शिवसेनेने मला फार मोठं केलं आहे, यात वाद नाही. गेल्या पंधरा वर्षांत मी काहीही मागितलं नाही. पक्षाचं प्रत्येक काम मी बघत होतो. पक्षप्रमुखांनी मला एक फोन करून ‘मी तुझ्याबरोबर आहे. मी तिकिट देऊ शकलो नाही,’ असं सांगितलं असतं तर माझ्यासाठी ते खूप झालं असतं. पण एक फोनसुद्धा त्यांनी मला केला नाही, त्यामुळे मी नाराज झाला आहे, हे खरं आहे.
भगव्यासोबत बेईमानी करणाऱ्यास सोडणार नाही असा दम भरसभेत नवनीत राणांनी दिला. लोकसभेत काहींनी कमळाविरोधात काम केलं. कमळामध्ये राहून विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराच राणांनी दिला.
मुरलीधर मोहोळांनी अजित पवारांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.जे माझ्यावर आरोप करतायंत त्यांनी सांगावं कुणाला उमेदवारी दिलीय. माझ्यावरील आरोप सिद्ध केले तर मी राजकारणातून संन्यास घेईन. असं विधान करत मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना थेट केलं आहे.
अंबरनाथमध्ये कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नुकतेच निवडून आलेले 12 काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजिवनी देवडे, दिनेश गायकवाड आणि किरण राठोड हे 12 नगरसेवक काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
एमआयएमचे नेते, माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना बुधवारी घडली. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आजपासून जलील यांच्यासोबत 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. दोन बंदूकधारी पोलीस देखील सुरक्षेसाठी आहेत.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे, यासाठी आटपाडीचे नगराध्यक्ष उत्तम जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आटपाडी ते पंढरपूर अशी 60 किलोमीटर पदयात्रा काढून विठुयाराला साकडे घातले. सलग 21 तास चालत येवून आज सकाळी आमदार पडळकर समर्थकांनी विठुरायाचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज संभाजीनगरमध्ये डिजिटल सभेचे आयोजन करण्यात आले आहे. एकाचवेळी 90 वॉर्डात या फडणवीसांच्या सभेचे प्रसारण करण्यात येणार आहे.
संतोष धुरी यांनी मनसे सोडल्यानंतर मनसेचे मुंबईचे अध्यक्ष संदीप देशपांडे हे देखील पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आज पत्रकार परिषद घेत संदिप देशपांडे यांनी आपण मनसेसोबत कायम असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच संतोष धुरी यांचा निर्णय योग्य की अयोग्य यावर आपण आत्ता भाष्य करणार नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३० (ड) मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार रामचंद्र गणपत माने यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेना अधिकृत उमेदवाश्री. अर्जुन बाबू पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
पर्यावरण अभ्यासक माधव गाडगीळ यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. आज संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या गाडीवर अज्ञातांनी दगडफेक केल. या दगडफेकीत ॉ प्रभाग क्रमांक ४१ मधील शिवसेनेच्या उमेदवार सारिका पवार या जखमी झाल्याची माहिती आहे. प्रचारादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.