Sitaram Kunte, Sanjay Pandey sarkarnama
महाराष्ट्र

CBIकडून राज्याचे मुख्य सचिव कुंटे, पोलिस महासंचालक पांडेंना समन्स

सीताराम कुंटे (Sitaram Kunte) आणि संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा केली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) आणि पोलिस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचा आरोप करण्यात आला आहे. याची चैाकशी सीबीआयकडून सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून पांडे व कुंटे यांना समन्स बजावण्यात आल्याचे समजते. मात्र, सीबीआयकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी सुरु आहे. ईडीकडून देखील याप्रकरणी चौकशी सुरू आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्या तपासाचा एक भाग म्हणून आता राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावण्यात आल्याचे समजते. सीबीआयने यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयकडून कुंटे आणि पांडे यांना समन्स बजावले जाणार आहेत. यामध्ये दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे जायचे, याबाबतची सविस्तर माहिती असेल.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र कारण सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे नक्की कोणत्या कारणास्तव दोन्ही अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सीबीआयसोबत चर्चा केली होती. आता दोन्ही अधिकाऱ्यांना सीबीआय कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहे. मात्र सीबीआय कार्यालयात जाण्यास दोन्ही अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT