Kolhapur/Dharashiv News : दोन एक दिवसांपूर्वी केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला. ज्याची माहिती रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे केंद्राने उसाच्या एफआरपीमध्ये टनामागे 150 रूपयांची वाढ केली. आता या निर्णयाचे देशभरातील शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे. मात्र कारखानदार नाराज झाले आहे. उसाच्या एफआरपी पाठोपाठ साखरेची एमएसपी न वाढविल्याने आता रोष व्यक्त केला जातोय.
केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करताना साखरेचे किमान विक्री दर (एमएसपी) वाढीबाबत निर्णय घेतला नाही. यामुळे कारखानादारांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच कारखानदारांनी केंद्राने एमएसपीबाबत निर्णय न घेतल्याने साखर उद्योग डबघाईला आणायचा आहे का? असा संतप्त सवाल देखील केला आहे. तसेच आधीच कर्जे काढून एफआरपीची रक्कम कारखाने देत असताना केंद्राने असा एकतर्फी निर्णय घेणे योग्य नाही. यामुळे साखर उद्योगच धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा आरोप कारखानदारांच्या संघटनांनी केला आहे.
केंद्राने साखरेची एमएसपी जाहीर केल्यापासून तब्बल सहा वेळा एफआरपीत वाढ केली, पण एमएसपी वाढीचा एकदाही निर्णय घेतला नाही. केंद्राचा हा दुटप्पीपणा असल्याची दावाही कारखानदारांनी केला आहे. 2019 साखरेची किमान विक्री मूल्य (एमएसपी) स्थिर असून तो त्यावेळीच वाढवण्यात आला होता. 2019मध्ये 3100 रुपये करण्यात आला होता. पण आता या सहा वर्ष झाले तरीही एकदाही एमएसपीत वाढ करण्यात आली नसून एफआरपी मात्र सहा वेळा वाढ करण्यात आल्या दावा देश पातळीवरील अनेक संघटनांनी केला आहे.
या निर्णयाचे स्वागत ‘विस्मा’ने केलं असून साखरेची एमएसपी कधी वाढणार? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे. दरम्यान केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने प्रत्येक वर्षीच्या आपल्या अहवालात साखरेची एमएसपीत वाढ करण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र केंद्र सरकार याकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याने साखर कारखाने प्रचंड आर्थिक संकटात आलेल्याची टीका विस्माचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांनी केली आहे.
यावेळी ‘विस्मा’ने उसाची एफआरपी आणि एमएसपीतील फरकाचा मुद्दाही उपस्थित केला आहे. उसाची एफआरपी 2750 रुपये प्रति टन असताना एमएसपी 2900 रुपये होती. त्यानंतर एमएसपीमध्ये 3100 पर्यंत वाढ झाली. पण एकदाही एमएसपी वाढवण्यात आला नाही, असा दावा केला आहे. दरम्यान आताही एफआरपी वाढ झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना टनामागे 150 रूपये वाढ मिळणार आहे. आता उसाची एफआरपी 3550 रूपये झाल्याचेही विस्माचे अध्यक्ष ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
तर ‘विस्मा’च्या वतीने केंद्र सरकारला कृषी मूल्य आयोगाच्या शिफारसीप्रमाणे एफआरपीत वाढ करण्यात यावी. ती किमान 4200 रुपये प्रति क्विंटल व्हावी. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीकडे कारखानदार वळले असून इथेनॉलची सुद्धा किंमत ही एफआरपी किमतीशी निगडीत धरावी. बी मॉलेसिस इथेनॉलची किंमत किमान 70 रुपये प्रति लिटर करावी अशीही मागणी ठोंबरे यांनी केली आहे.
केंद्राने ज्या पद्धतीने उसाच्या एफआरपीबाबत निर्णय घेतला. तसाच निर्णय तातडीने साखरेच्या एमएसपीबाबत घ्यावा. साखरेची एमएसपी 4200 रुपये प्रतिक्विंटल व इथेनालची किंमत 70 रुपये प्रति लिटर करावा अशी मागणी विस्मा’ने केली आहे. तर देशातील साखर उद्योग जिवंत ठेवायचा असल्यास हा निर्णय लवकर घ्यावा. अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी सशक्त करण्याच्या प्रयत्नात कारखाने अडचणीत येतील. ते नेस्तनाभूत होतील. याचा फटका नंतर ऊस उत्पादक शेतकरी देखील बसून ते देखील अडचणीत येतील अशीही शंका ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.