Chandrasekhar Bawankule Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Leader Chandrashekhar Bawankule : मोदी, शाह यांनी कलम 370 हटवले, अन् काश्मीरचे स्वर्गत्व परत आले..

Article 370 was deleted today : कश्यप ऋषींच्या तपस्येने पावन झालेल्या काश्मीर भूमीचे स्वर्गत्व आता परत येण्यास सुरुवात झाली आहे, अशा भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या आहेत. हा देश पुन्हा एकदा एकसंध केल्याबद्दल नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमितभाई शाह व मोदी सरकारचे मनःपूर्वक आभार!

Jagdish Pansare

BJP Political News : पाच वर्षापुर्वी आजच्याच दिवशी केंद्रातील मोदी सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटवले होते. त्यानंतर गेल्या कित्येक वर्षापासून धुमसत असलेले जम्मू-काश्मीर आता शांत आहे. खऱ्या अर्थाने काश्मीर भूमीचे स्वर्गत्व परत आले आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

पाच आॅगस्ट रोजीच पाच वर्षापुर्वी संसदेत काश्मीरमधून कलम 370 हटवण्याची घोषणा करण्यात आली होती. याची आठवण करून देत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी एस्कवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर किती परिस्थीती बदलली? दहशतवादी कारवाया कमी झाल्या का? काश्मीरी तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला का? असे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थितीत केले जातात.

भाजपने मात्र कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खऱ्या अर्थाने पुन्हा नंदनवन झाल्याचा दावा केला आहे. कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक घटनेला पाच वर्ष आज पुर्ण होत आहेत. पाच आॅगस्ट म्हणेज आजच्या दिवशी पाच वर्षांपूर्वी देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह यांनी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काश्मीर उर्वरित भारतापासून वेगळे करणारे कलम 370 रद्द करण्याची घोषणा संसदेत केली.

आज पाच वर्षानंतर काश्मीरमध्ये ऐतिहासिक शांतता आहे. सैन्यावर दगडफेकीच्या घटना शून्यावर आल्या आहेत. काश्मीरचा युवा आज दहशतवादाकडे न जाता उत्तम रोजगाराच्या दिशेने वळतोय. (BJP) आपला सकाळी गेलेला मुलगा संध्याकाळी घरी येतो की नाही ही चिंता आज काश्मीरच्या मातेला नाहीये.

कश्यप ऋषींच्या तपस्येने पावन झालेल्या काश्मीर भूमीचे स्वर्गत्व आता परत येण्यास सुरुवात झाली आहे, अशा भावना चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या आहेत. हा देश पुन्हा एकदा एकसंध केल्याबद्दल पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह व मोदी सरकारचे मनःपूर्वक आभार!, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT