Chandrashekhar Bawankule Sarkarnama
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule News: मोदींवरील टीकेने बावनकुळे संतापले, काँग्रेसला दाखवला आरसा!

Jagdish Patil

BJP Vs Congress News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी "मी जे काही करतो ते ईश्वर करून घेत असतो" असं विधान केलं होतं. निवडणुकीच्या एका भाषणात पंतप्रधान मोदींनी हे विधान केल्यानंतर काँग्रेसने त्यांना टिकेचे लक्ष्य केलं होतं. याच मुद्यावरुन आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला घेरलं आहे. मोदींवरील टीकेला सडेतोड उत्तर देण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

बावनकुळे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओत खर्गे (Mallikarjun Kharge) यांची विविध विधाने आहेत. यामध्ये खर्गे "मेरा नाम है मल्लिकार्जुन खर्गे. मैं ईश्वर का अवतार हू..." असं म्हणत आहेत. या व्हिडिओद्वारे पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना त्यांनी आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) काँग्रेसच्या नेत्यांच्या टीकेमुळे चांगलेच संतापले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात बावनकुळे म्हणाले, मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर सातत्याने टीका करीत आहेत. ते भाजपवर टीका करताना तथ्यहीन गोष्टी पसरवीत असतात. नुकताच एक्स समाज माध्यमावर त्यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्याबाबत बावनकुळे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी आमच्या नेत्यांवर टीका करण्याआधी स्वतः आघाडी केलेल्या पक्षाचे नेते काय म्हणतात हे पाहिले पाहिजे, असे देखील बावनकुळे यांनी सुनावले.

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. पाच टप्प्यातील मतदान उरकले आहे. येत्या एक जूनला शेवटचे सहाव्या टप्प्यातील मतदान होईल. निवडणूक प्रचाराचा ताण सर्वच स्टार प्रचारकांवर दिसू लागला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सर्वाधिक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानांवर टीका करण्याचे आयते कोलीत विरोधकांना मिळाले आहे. यावरून सध्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर इंडिया आघाडीचे नेते खरमरीत टीका करीत आहेत. त्यामुळे भाजप नेते संतापल्याचं दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT