Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोट निवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अर्ज दाखल करणार असून त्यासाठी महायुतीतील वरिष्ठ नेते बारामती मध्ये दाखल झाले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील बारामतीच्या दिशेने रवाने झाले आहेत. त्यापूर्वी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसने संस्कृती आणि संस्कार दाखवूया निवडणुकीमध्ये उमेदवार देऊ नये अशी भूमिका मांडली आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी बारामती मध्ये जात आहे. मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा महायुतीच्या वतीने बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज आम्ही भरणार आहोत. बारामती आणि राहुरी मधील दोन्ही महायुतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला विश्वास आहे.
मात्र सर्व पक्षांना विनंती करतो की माननीय अजित पवारांचा जो जीवन प्रवास राहिला आहे. तो सगळा प्रवास काँग्रेस सोबत राहिला आहे. काँग्रेसच्या बहुतांशी नेत्यांना त्यांचा संवाद आणि संपर्क लाभला आहे त्यामुळे बारामती मध्ये काँग्रेस पक्षाने निवडणूक लढवू नये ही विनंती सुनेत्रा पवारांच्या पाठीमागे त्यांनी राहावं अशी आमची विनंती असेल.
राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणूक ही वेगळी आहे. कारण बारामतीची जागा अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने अजित दादांचा विचार करावा आणि ही निवडणूक लढू नये कारण अजित दादांचा जीवन हे काँग्रेस पक्षाच्या सहवासात अनेक वर्ष गेले आहे.
मात्र काँग्रेस पक्षाला संस्कार आणि संस्कृती राहिली नसेल तर त्यांनी निवडणूक लढल्यास हरकत नाही. राहुरी आणि बारामती निवडणुका वेगवेगळ्या आहेत. काँग्रेसने राहुरी निवडणूक लढली तरी चालेल मात्र बारामतीची निवडणूक वेगळी असल्याने त्यांनी त्या ठिकाणी विचार करणे आवश्यक आहे.
काँग्रेसने बारामती विधानसभा मतदारसंघात उमेदवार द्यावा याबाबत शरद पवार साहेबांची भूमिका काय आहे. हे त्यांनी ठरवावी माझी भूमिका आणि माझ्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की बारामती मध्ये काँग्रेसने निवडणूक लढू नये अशीच आहे.
दरम्यान, सरकारने अजित पवार यांच्या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला तर आम्ही उमेदवारी मागे घेऊ अशी अट काँग्रेसकडून घालण्यात आली आहे. त्याबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, काँग्रेस अशा प्रकारची अटी घालत आहेत. कारण त्यांना निवडणूक लढवायची आहे. मात्र बारामतीची जनता सुनेत्रा पवारांना एवढ्या मताने निवडून आणेल की काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. काँग्रेसचा आतापर्यंत जेवढा मोठा पराभव झाला नसेल तेवढा बारामतीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव होईल त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशी परिस्थिती होईल इशारा बावनकुळे यांनी दिला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.