Chhagan Bhujbal Udayanraje  sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal On Udayanraje : उदयनराजे म्हणाले, मुलींची पहिली शाळा प्रतापसिंहराजेंनी सुरु केली; छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया,'ते राजे आम्ही...'

First Girls School Controversy Chhagan Bhujbal Udayanraje: मुलींसाठी पहिली शाळा प्रतापसिंहराजे यांनी सुरु केल्याचा दावा खासदार उदयनराजे यांनी केला आहे.

Roshan More

Chhagan Bhujbal Latest News : खासदार उदयनराजे भोसले यांनी मुलींसाठी पहिली शाळा साताऱ्यातील आपल्या राजवाड्यात प्रतापसिंहराजे यांनी सुरू केली असल्याचा दावा केला. तसेच महात्मा फुलेंनी देखील त्यांच्याकडूनच प्रेरणा घेतल्याचे म्हटले. उदयराजेंच्या दाव्यावर माजी मंत्री, आमदार छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले, 'ओ राजा है हम प्रजा है! हम उनके खिलाफ कैसे बात करे भाई. पण मला एक माहिती आहे पूर्वीची राजे आपल्या मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यातच व्यवस्था करत होते. पण राजघराण्यातील मुलांसाठी सार्वजनिकरित्या नाही.'

'ती शाळा सार्वजनिकरित्या 1851 साली ब्रिटीशांकडे सुपूर्द करण्यात आली. पण सार्वजनिकरित्या महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 साली सुरु केली', असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले.

मी जे काही वाचले त्यानुसार महात्मा फुले यांनी थाॅमस पेन आणि जगातील तत्वज्ञ यांची पुस्तक वाचून स्त्री शिक्षणाची प्रेरणा घेतली. आता खासदार उदयराजे भोसले ( Udayanraje) जर या संदर्भात बोलत असतील तर मी काय बोलणार हम प्रजा है वह राजा है, असे देखील भुजबळ म्हणाले.

उदयनराजे यांचा नेमका दावा काय?

युगपुरुषांचे अनुकरण पुढील पिढीने करायला हवे. त्यासाठी त्यांचे स्मारक व्हायला हवे. थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांचे अनुकरण महात्मा फुलेंनी केले. कारण त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली ती पण त्यांच्या सातरच्या राजवाड्यात. त्याच शाळेत पुढे जाऊन देशाचे संविधान लिहिणारे डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील प्राथमिक शिक्षण घेतले, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT