Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : 'त्यांनी स्वत: केलं तर ठीक अन्यथा दंडही वसूल करा'; छगन भुजबळ यांची खळबळजनक मागणी

Chhagan Bhujbal on Ladki Bahin Yojana : नियमांचे पालन न करणाऱ्या महिलांनी स्वतःची नावे स्वतः काढून घ्यावीत असे आवाहन जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच त्यांनी, अपात्र महिलांनी तसे न केल्यास राज्य शासनाने काय करावं ते तेही सांगितलं आहे.

Aslam Shanedivan

Nashik News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या लाडकी बहीण योजनेवरून आता अनेक चर्चा समोर येत आहेत. ही योजना बंद केली जाईल, तर यात निकष लावून महिलांची संख्या कमी केली जाईल असेही बोलले जात आहे. याचदरम्यान कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार आल्यास अर्जाची छाननी केली जाईल. तो अर्ज निकषबाह्य ठरल्यास बाद करू, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे राज्यातील महिलांमध्ये चिंता पसरली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडक्या बहिणींना आता इशारा दिला आहे. सध्या त्यांच्या या इशाऱ्याची राज्यात चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठे विधान केले आहे. योजनेचे नियम कडक करण्याचे संकेत देत त्यांनी, जे नियमांमध्ये बसत नाहीत, त्यांनी स्वतःची नावे काढून टाकावीत, असे आवाहन महिलांना केले आहे.

ज्या महिला आपली नावे काढून घेणार नाहीत त्यांना इशारा देताना, अन्यथा, त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल केले जाऊ शकतात असेही म्हटले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या अपात्र महिलांना सरकारने पैसे दिले आहेत, ते परत मागण्यात काहीच अर्थ नाही. ज्या महिला नियमांचे पालन करत नाहीत त्यांना आधी दिलेले पैसे परत करण्यास सांगू नये, अशी सरकारला सल्ला दिला आहे.

तर मी लोकांना सांगू इच्छितो की ज्या महिला या नियमांचे पालन करत नाहीत. त्यानी स्वतःचे नाव काढून टाकावे. भूतकाळात जे काही घडले ते घडले. पण आता येत्या काळात लाडली बहीण योजनेचे नियम अधिक कडक होतील, असेच काहीसे संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. जुलै २०२४ पासून, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेअंतर्गत १,५०० रुपये दिले जात आहेत. या योजनेच्या सुरूवातीलाच काही निकष लावले होते.

ज्यामध्ये कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. घरात चारचाकी वाहन नसावे आणि एकाच घरातील दोन महिलांना हा लाभ घेता येणार नाही, अशा अटींचा समावेश होता. मात्र अनेक महिलांनी नियमांमध्ये बसत नसतानाही लाडली बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता नवे निकष लावले असून अर्जांची पडताळणी केली जात आहे. यात अनेकांचे अर्ज बाद झाल्याचेही समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT