<div class="paragraphs"><p>Anil Deshmukh</p></div>

Anil Deshmukh

 
Sarkarnama
महाराष्ट्र

अनिल देशमुखांची पुन्हा चैाकशी होणार ; क्लीन चीट अहवाल लीक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (cbi) प्राथमिक तपासात दिल्ली न्यायालयाने क्लीन चीट दिल्याचा अहवाल लीक केल्याप्रकरणी त्यांच्या चैाकशीचे पुन्हा आदेश दिले आहे. अहवाल लीक केल्याप्रकरणी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने देशमुख यांच्या भूमिकेची अधिक चैाकशी करण्याचे आदेश दिले आहे.

''सीबीआयच्या आरोपपत्रात देशमुख यांना आरोपी बनवलेले नसले तरी ते मोठ्या कटाचा भाग असू शकतात. कारण, त्यांना या प्रकरणातील माहिती लीक झाल्याचा सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसत आहे,'' असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

सीबीआयने ट्रेन खेचणारे इंजिन सोडून दिलेले दिसते, त्यामुळे केवळ वाहनात प्रवास करणाऱ्यांवरच आरोप केले जातात. मात्र, इंजिन किंवा घोड्याने ओढल्याशिवाय गाडी चालवणे शक्य होत नसते. वरवर पाहता पुष्कळ पुरावे असूनही, असे दिसते की सगळी कारणे माहीत असूनही, याप्रकणाचा मास्टर माईंड सोडून दिला आहे. त्यामुळे सीबीआयने या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेची आणि तपशीलाने कालबद्ध चौकशी करावी, असे निर्देश दिले आहेत. याप्रकणी राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सीबीआयला 4 आठवड्यांच्या आत सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत १०० कोटींची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना अटक केली होती. या प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेले अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

न्यायालयाने त्यांच्या कोठडीमध्ये २७ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे. अनिल देशमुखांनी पैशांची मागणी केली नसल्याचा जबाब सचिन वाझेने चांदीवाल आयोगासमोर दिला. पण, देशमुखांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. त्यातच, आता अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

देशमुखांचे वकील गैरहजर असल्यामुळे त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. सचिन वाझे याच्या उलट तपासणीवेळी देशमुखांचे वकील गैरहजर होते. विशेष म्हणजे दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीत जमा करण्याची सूचनाही आयोगाने दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाची चांदीवाल आयोग देशमुखांची चौकशी करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT