Uddhav Thackeray and Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Shiv Sena Thackeray Party : शिंदे-फडणवीस यांचे 'चेहरे' गमतीशीर; फडणवीस यांचा चेहरा काळवंडलेला

Pradeep Pendhare

Mumbai News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लांबणीवर टाकण्यावरून मोदी-शाह आणि शिंदे-फडणवीस यांच्या चेहऱ्यावरून 'सामना'च्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे. हरियाणा, जम्मू-काश्मीरबरोबर महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्याही निवडणुका घ्यायला काहीच हरकत नव्हती. पण मोदी-शाह यांचे चेहरे लोकांना पसंत नाही.

तसंच महायुतीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरून संघर्ष पेटलाय. शिंदेच मुख्यमंत्री राहतील, हे महायुतीमधील मित्रपक्ष सांगायला तयार नाही. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री चेहरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ठरावावं, शिवसेनेचा त्याला पाठिंबा असेल, असं सांगून देखील देवेंद्र फडणवीस 'मविआ'चा चेहरा उद्धव ठाकरे नसतील, अशी 'बासुंदी' उधळत आहेत. फडणवीस यांनी स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी करावी, अशी जहरी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा दारुण पराभव होत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये नरेंद्र मोदीचा (Narendra Modi) चेहरा चालणार नाही. महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या निवडणुकाही हरियाणाबरोबर घ्यायला काहीच हरकत नव्हती. पण इथंही मोदी-शाह यांचे चेहरे लोकांना पसंत नाहीत, अशी टीका सामनाच्या 'चेहरा कोण?' या अग्रलेखातून केली आहे. याशिवाय महाराष्ट्रात महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदे राहतील, हे सांगितले जात नाही. परंतु त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतील, असे आवर्जुन सांगितलं जात आहे.

शिंदेंनी गुवाहाटीत रेड्यांचे कितीही बळी दिले, तरी महाराष्ट्रातील जनतेचं परिवर्तन होणार नाही. राहिला देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा धड नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्याची ते उठाठेव करत आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 'मविआ'च्या चेहरा नसतील, अशी बासुंदी उधळत फिरत आहे. यातून त्यांनी त्यांचे गणित कच्चे आहेत, हे दाखवून दिलं आहे. स्वतःच्या काळवंडलेल्या चेहऱ्याची काळजी त्यांनी करावी, असा खोचक सल्ला देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

अजित पवारांनी गुलाबी रंग अंगावर चढवला

महायुतीमधील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री पदाची खेचाखेची सुरू आहे. फडणवीस देखील 2024 च्या निवडणुकीत शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील, असं सांगू शकत नाहीत. अजित पवार यांनी महायुतीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेऊन मुख्यमंत्रीपदासाठी किती उतावीळ आहोत, हे दाखवण्यासाठी गुलाबी रंग अंगावर चढवला आहे. फडणवीस नागपूरच्या खिडकीत बसून येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे चाचपणी करत बसलेत, त्यामुळे तिघांच्या तीन तऱ्हा, असताना फडणवीस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत, असे सांगत बसले, असा खोचक टोला देखील लगावला आहे.

फडणवीस राजकीय आकलनात कमी

राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या लोकप्रियतेची धास्ती त्यांच्या मनानं घेतली. यातून त्यांचं गणित बिघडत चाललंय, यातून ते नुसती उठाठेव करत आहे. त्यामुळे त्यांच्या बुडाखाली काय जळतंय, हे त्यांच्या लक्षात येईना. फडणवीस स्वतः अपमान करून घेत, सत्तेत बसले आहेत. त्यांचाच चेहरा त्याची साक्ष देत आहे. अशा फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचा चेहरा त्रास देत आहे. फडणवीस यांचे राजकीय आकलन आणि गुप्तहेर कमी पडलेत. यातून त्यांच्या छचोर चाणक्यागिरीचा बाजार उठल्याचा टोमणा देखील अग्रलेखातून लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT